आत्मनिर्भर

“मंजिरी नाव हिचं. बीएड केलं आहे. कशी वाटते तुला?” व्हरांड्यात लॅपटॉपवर स्थळ शोधत बसलेल्या बाबांनी विनयला एक स्थळ सुचवलं. विनयने हातातला चहाचा कप बाबांना दिला. “बाबा, निदान या लॉकडाऊनमध्ये तरी मुली दाखवायचं थांबवा हो.” ” लॉकडाऊन संपल्या संपल्या तू कोणी सून म्हणून माझ्यासमोर उभी करणार असेल, तर मी हे सगळं आत्ताच बंद करतो बघ.” लग्नाचा…

आता ऐका रेडिओवर

पुस्तक वाचायचाही कंटाळा आलाय…. मग आता रेडिओवर पुस्तक ऐका. माझी रेडिओवरची पहिली ऑडिओ कथा. Happy to share with you My First Audio Book released on FM. Thanks to Kuku FM team & RJ Maya. Listen to the  Audio Book Runanubhandhhttps://applinks.kukufm.com/9hThK2VPZPt76X818

रहस्य वट (भाग २ अंतिम भाग)

निरजला जाग आली तेव्हा त्याचे डोळे निरभ्र आकाशाकडे उघडले. बावरलेल्या अवस्थेत तो बाजेवर ताडकन उठून बसला. समोर पाहतो तर उंच माड, त्याच्या बाजूला ढाबा आणि ढाब्यासमोर लावलेली त्याची बाईक नजरेस पडली. ढाबा मालक त्याच्या उठण्याची वाटचं बघत होता. निरजला अजूनही डोकं जड वाटतं होतं. त्याला रात्रीच्या घटनेबद्दल पुसट पुसट आठवलं आणि मग आठवला तो मंदार….

रहस्य वट (भाग १)

“मंदया चल, शेवटची रिडींग दे. आज काही संपणार नाही हे काम. साडेपाच झाले. परत निघायला हवं. ओव्हर.” थिऑडोलाइटवर (एक उपकरण) रीडिंग घेत असलेल्या निरजने, त्यापासून साधारण एक किलोमीटर दूर प्रिझम पोल घेऊन उभ्या असलेल्या मंदारला वॉकीटोकीवर सांगितलं. निरज आणि मंदार लहानपणापासूनचे जिवाभावाचे मित्र. दोघांनी एकाच कॉलेजमधून सर्व्हेइंगच (भु-सर्वेक्षण) शिक्षण घेतले. शहरातील एका नामांकित बिल्डरकडून निरज…

रावणवध

रावणवध Live Match बघायला जेवढी उत्कंठा आणि मज्जा येते, तशी उत्कंठा आणि मज्जा Match चे Highlights बघायला येत नाही. त्यातल्यात्यात Live Match मधली एखादी उत्कृष्ठ Wicket, Catch, Century किंवा एखादा Six बघायचा राहून गेला असेल तर, पूर्ण Match बघितल्याचं सुख एकीकडे राहतं आणि नेमकं जे बघायचं राहून गेलंय त्या दुःखाच ओझं सुखाच्या पारड्यापेक्षा बऱ्याच पटीने…

चोचले

२००६ ची गोष्ट आहे. मी एकदा कोणार्क एक्सप्रेसने भुवनेश्वरवरून पुण्याला येत होतो. ट्रेनमध्ये एक गुजराती वयस्कर जोडपं माझ्या बाजूच्या सीटवर होते. ते बोलके आणि मी तर अतिबोलका…त्यामुळे लगेच ओळख झाली. बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडची स्नॅक्सची पोटली खोलली आणि त्यातून खाकरा, ढेपला, ढोकळा सारखे एक सो एक स्नॅक्स काढले. त्यातून त्यांनी मला नेमका नको…

ठेचाऽऽ

“आयऽआयऽऽआयऽऽऽआयऽऽऽ मिरची लागली मिर्ची ! पाणी दे पाणी…हाऽऽऽहुसऽऽऽहाऽऽऽहुसऽऽऽ” “झेपत नाय तर खातो कशाला रे भुसनाळ्या! आता बोंबोलतो ते बोंबोलतो, सकाळी डेचकी घेऊन जातो तव्हापण कोकलतो. बंद कर ते ठेचा खाणं.” “काय क्राव तात्या, ठेचा नसला तर काय ग्वाड लागत नाय अन दिसला की जिभेवर ताबा ऱ्हातो व्हय.” लहानमुलाने भान हरपून कॅडबरी खावी, एवढं एकचित्त होऊन…

Lockdown

अखेर आज तू पण ……उंबऱ्याच्या आत डांबला गेलास,सर्वांना कोंडणारा तू……स्वतःच पिंजऱ्यात कोंडला गेलास,

माणुसकी

आज चक्क वसंतात, काळोख दाटलाय नभी,आज पहिल्यांदाच पाहिली, भिजलेली गुढी, अजून बरंच काही पहिल्यांदाच, बघायला भेटणार,सृष्टीचा कोप सारा, तुझ्या अहंमला भेदूनच थांबणार, फक्त तुझेच स्वनिर्मित संकट हे, आज तू भोगतोय‘सबकुछ झूट’ म्हणत,मग परमात्म्याला का कोसतोय? जात-पात, उच-नीच, नीती-अनीती हे फक्त तुझं अज्ञान,वेळीच विझव, हे ‘माणसानेच माणसासाठी’ पेटवलेलं रान, भूकंप, पूर, महामारी अश्या परीक्षांचा सृष्टी घाट…

1BHKRequired

“Urgently Required 1BHK for Couple” रविवारच्या आळसावलेल्या सकाळी, सोफ्यावर उताणा झालेल्या मकरंदने ग्रुपवर आलेला मॅसेज वाचला आणि त्याचे सुस्तावलेले डोळे पूर्ण उघडले. “आता एवढा मोठा 3BHK असतांना, याला कशाला हवाय 1BHK…. असो कदाचित मित्रासाठी हवा असेल” आपला खास मित्राला ‘का? कसा? कोणासाठी?’ असा कुठलाच “क” श्रणीतला प्रश्न न करता, मकरंदने काल एका मार्केटिंग ग्रुपवर आलेला…