बायंगी (भाग-४)

मी सकाळी रत्नागिरीला पोहचलो. बसस्टँडवरच फ्रेश झालो. बसस्टँडवरच झटपट नाष्टा उरकला आणि परत लांजाची बस पकडली. तास-दिडतासात लांजाला पोहचलो. बसस्टँडच्या बाहेर आलो तसा आप्पांचा शोध सुरू केला. तीन-चार दुकानात विचारपूस करून झाल्यावर; एका दुकानदाराने सांगितलं की, ‘इथून वीस किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे, तिथे आप्पा राहतात.’ उकड्यामुळे आधिच वैतागलो होतो, त्यात आप्पाचा शोध संपत नव्हता….

बायंगी (भाग-३)

मी दुसऱ्या दिवशी मुंबई गाठली आणि नोकरीवर रुजू झालो.पहिल्या दिवशी ऑफिसातील ओळख, परिचयाची औपचारिकता संपवून; डोक्यावरच्या छप्परची व्यवस्था करण्यासाठी ऑफिसातून लवकर बाहेर पडलो. तसं माझं राहण्याचं ठिकाण ठरलेलंच होतं. सम्या रहायचा तिथं जवळच बॉईज हॉस्टेल होतं. तिथं राहण्यामागे माझे दोन उद्दिष्टे होती. एकतर तिथून ऑफिस जवळ होतं, दुसरं म्हणजे सम्या गायब होण्यामागे काहीतरी गूढ नक्की…

बायंगी (भाग-२)

दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर आवरुन, सम्या सोबत शॉपवर जायला तयार झालो. सम्याने थोडे आळोखे-पिळोखे घेतले, पण शेवटी त्याला कळून चुकलं की, मी त्याचा पिच्छा सहजासहजी सोडणार नाही. म्हणून त्रासून का होईना, शेवटी तो मला नेण्यास राजी झालाच. आम्ही दुकानावर पोहचलो. त्याच्या दुकानात काम करणारा माणिक त्याची वाटच पहात होता. सम्याने दुकानाच्या चाव्या माणिकला दिल्या….

बायंगी (भाग-१)

“माझ्या मुंबईच्या जॉबच आज फायनली पक्कं झालं रे पोट्यांन्नो.” नेहमीच्या कट्टयावर बसलेल्या मित्रांना पाहून मी मोठ्याने चिरकलो. “काय सांगतोस मक्या! मस्त काम झालं हे आणि हो रे… असं सूकं सूकं सांगतोस का?” नेहमीप्रमाणे चेत्याने पार्टीच तुणतुण वाजवलंच. “झालं काढलंच का पार्टीच खुसपट मध्येच. अरे पहिले या भोपळ्याला टुनुकटुनुक उड्या मारत मुंबईला जाऊ दे, चांगली तूप…

पुत्रवती भव?

रात्रीचं जेवण उरकलं, टिव्हीचा रिमोट हाती घेतला आणि आवडती छत्रपती संभाजींची मालिकेच्या प्रतिक्षेत सोफ्यावर विसावलो. तसा मी फारसा काही ऐतिहासिक मालिकांच्या भानगडीत पडत नाही, कारण लहानपणी बऱ्यापैकी ऐतिहासिक कथा कादंबऱ्या माझ्या नजरे खालुन गेल्या होत्या, हे काही ‘मी खुप मोठा वाचक वैगरे आहे’ असं काही कोणाला भासवण्यासाठी मुळीच लिहीत नाही, पण हे सांगण्याचा हेतु म्हणजे,…

बाबा

आम्ही मागितले खेळणं,ते आमच्या सोबत तासनतास खेळले,आम्ही मागितले कपडे,त्यांनी मात्र फाटक्या बनियानीवर वर्ष काढले, आम्ही मागितले स्कुटर,ते सायकलीवरच रोज गावभर फिरले,आम्ही मागीतले शिक्षण,त्यांनी मात्र तीन-तीन शिफ्टमध्ये दिवस काढले, आम्ही मागतच राहिलो,आणि ते नेहमी भरभरून देतच राहिले,आम्ही लहानाचे मोठे झालो,पण ते मात्र आमच्या बालपणातच रमले. प्रश्न नव्हता गरिबीचा कधीच,ना कधी प्रश्न होता पैशांचा,त्यांच्या छोट्या छोट्या तडजोडीत,तो…

फर्स्ट प्रपोज

भाग २(अंतिम भाग) थोडया वेळाने मला शुध्द आली, तेव्हा माझ्यासमोर कोणीच नव्हते. घराचं दार वाजवून मायराला उठविण्याची माझी हिंमत झाली नाही. दुसऱ्या दिवशी अंगात क्षीण होता. पण माझ्यात घरी थांबायचं धाडस नव्हतं. मायराच्या घरासमोरून जातांना मी नजरही वर केली नाही. दिवसभर माझ्या डोळ्यासमोर कालची रात्र गिरक्या घालत होती. आपण अशा व्यक्तीवर प्रेम करतोय जी जिवंतच…

फर्स्ट प्रपोज

भाग – १ “मस्तऽऽऽ छान आहे घर. आफिसच्या इतक्या जवळ आणि एवढ्या कमी रेंटवर असं टुमदार घर मिळवून दिल्याबद्दल खूप धन्यवाद मित्रा.” मी रियल इस्टेट एजेंटचे आभार मानले. मला हवं तसं घर बघून मी हुरळून गेलेलो. “नचिकेत सर, कशाला लाजवता……ते तर आमचं कामाचं…..बाय द वे, हा घ्या ऍग्रीमेंट…सगळं वाचून घ्या, सही करा नि मग मी…

रखमाची भुरुनी

“ताई, म्ही तर चिकन मटण खातचं नाय, पण पोरासनी दर चार पाच दिसामधी चाळीस पन्नास रुप्याची चिकन आणून भुरुनी करून खाऊ घालायचीच. “अच्छा” “अव पण आता कुठला काय तो करणा आलाय ना ,तर सगळं बंदच करून टाकलंय.” “हम्म बरं केलं बघ आणि ते करना नाही, कोरोना आहे ग.”“हा तेच ते.” रखमा भांडे धुवायला गॅलरीत गेली….

प्रशंसा आणि टीका

प्रशंसा पाण्यावर पडलेल्या फुलासम भावते, मोहते व कालांतराने वाहून जाते. पण टीका पाण्यात मारलेल्या दगडासम जोरात लागते, बोचते व आत खोलवर रुतून बसते.          खळाळणाऱ्या पाण्यासारखं अवखळ मन थोडं स्थिरावत, सगळं झेलत आणि झेलायलाही पाहिजेच! कारण त्याशिवाय त्याचं उदारत्व सिध्द होत नाही. पण शब्दानेही कुठेतरी थांबायला नको?                शब्दाने एकवेळ फुल नाही बनलं तरी चालतं, पण दगड…