सकारात्मक

भगवंताने एक सुंदर जीवन आपल्या ओंजळीत टाकलंय. या सुंदर जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं तर सगळंच मनोहरी, रमणीय आणि सकारात्मक दिसतं…. मग आपली झोळी भरलेली असो की फाटकी. आणि जेव्हा दृष्टीकोन सकारात्मक होतो तेव्हा……भरगच्च वर्दळीपलीकडे रंगबेरंगी फुलांची फुललेली बाग दिसू लागते…. तोकड्या अवस्थेत जगणाऱ्या चेहऱ्यावरही खळखळून ओसंडनारा आनंद दिसू लागतो….थकून भागून घरी पोहचलेल्या देहाला चिमुकल्यामधला सळसळणारा…

पुण्यमृदा (भाग-सहावा आणि सातवा)

(भाग-सहावा) एका दिवशी अचानक, “मीरे यातली तुला कोणती साडी आवडली सांग पटकन” मीराच्या बाबाने विचारले. “अय्या …. किती भारी….बाबा मला ही आवडली” मीराने लगेच आपली आवड कळवली खरी पण पुढच्या क्षणाला तिच्यात डोक्यात संशयाची पाल चुकचुकली. “बाबा पण का हो….ह्या साड्या कोणासाठी? मी तर काही साडी घालत नाही?’” “अग वेडे तुला बघायला उद्या पाहुणे येणार…

पुण्यमृदा (भाग-चौथा आणि पाचवा)

अर्णबच मीरावर खरचं कितपत प्रेम होतं याची कल्पना त्यालाच नव्हती. पण त्या दिवसापासून त्याबद्दलची सर्वच समीकरणं बदलेली होती. मीराबद्दल त्याच आकर्षण जास्त वाढलेलं होतं. पहिले मीरा वाट बघायची आता अर्णब तिची वाट पाहू लागला होता. तो तिच्या हळूहळू जास्त जवळ येऊ लागला होता. कधी तिला हात सुध्दा न लावणारा अर्णब, तिचा हात हातात घेण्यासाठी, तिच्या…

पुण्यमृदा (भाग-दुसरा आणि तिसरा)

पुण्यमृदा (भाग-दुसरा ) “मैं वहा सिर्फ और सिर्फ मिट्टी ही लाने के लिए जा रहा हूँ। दुर्गा माता की मुरत बनाने के लिए, चार चिजे बहुत जरुरी होती है। गंगा तट की मिट्टी, गाय का गोबर, गौमूत्र और वेश्यालय की मिट्टी जिसे पुण्यमाटी माना जाता है। इन चार चिजो बैगर मूरत बनती ही नहीं| इसलिए…

दादा म्हणायचं राहून गेलं….

दादा स्वतःला आवडणारी राखी स्वतः आणायचा आणि छोटीच्या हातात द्यायचा. छोटीचे इवले इवले हात राखी घेऊन भावापुढे यायचे. छोटीला अजुन ओवळता येत नव्हते म्हणुन दादाचं तिच्या लुटपुट्या हातातली थाली पकडायचा आणि स्वतःच ओवाळून घ्यायचा. राखी बांधता येत नाही म्हणून दादाचं छोटी समोर हात पुढे करून तिच्या हाताने आपल्या मनगटावर फक्त राखी ठेवुन घ्यायचा आणि नंतर ती राखी…