रखमाची भुरुनी

“ताई, म्ही तर चिकन मटण खातचं नाय, पण पोरासनी दर चार पाच दिसामधी चाळीस पन्नास रुप्याची चिकन आणून भुरुनी करून खाऊ घालायचीच. “अच्छा” “अव पण आता कुठला काय तो करणा आलाय ना ,तर सगळं बंदच करून टाकलंय.” “हम्म बरं केलं बघ आणि ते करना नाही, कोरोना आहे ग.”“हा तेच ते.” रखमा भांडे धुवायला गॅलरीत गेली….

एक मंत्रचळ केस.

“मक्या, ह्या बल्लूला सांग यार…सारखं सारखं कोणाच्याही केसात का हात घालतो?, स्वतःच्या केसांचा हा कसला माज”  विजू मक्याला काकुळतेने आर्जव करत होता. “तुला आवडत नाही ना. मग…एक काम कर स्वतःच टक्कल करून टाक. तो काय शहाणा आहे का.” विजू मक्याकडे पाहतच राहिला. “अरे टक्कल ही केलं असतं पण हा लेकाचा टकल्यांनाही सोडत नाही यार. आता…

PAIN ऑफ पेन

बॉसच्या केबिनमध्ये फाईलांची जोरदार आदळआपट चालू होती. “यु आर अबसुलटली नॉट ऐट ऑल सिरियस अबाऊट युअर वर्क!!!!! आजपण लेट???? काय चाललंय काय तुझं????? काय आज काय नवीन कारण????” हे बोलतांना लालेलाल झालेले डोळे, चेहऱ्यावर मला खाऊ का गिळूचे पाशवी भाव आणि मनात ‘आज कसा गावला लेका’ असा आसुरी आनंद बॉसच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. या…

दिल, दोस्ती आणि Etc.

त्या गोड गुलाबी थंडीतल्या सकाळी मी आणि दत्ता थोडं लवकरच कॉलेजला येऊन ठेपलो होतो, आता इतक्या लवकर काय करायचं म्हणुन कॅन्टीन कट्ट्याला जाण्यासाठी मागे फिरलो तोच समोरून सडसडीत बांधा, नाके-डोळी सुंदर असलेली ‘शालिनी’ कॉलेजच्या आत शिरत होती, दरवाज्यात आमची नजरेला नजर जशी भिडली रे भिडली, तसा कधीही कोण्यामुलीशी दोन वाक्य बोलतांना हजारदा लाजणारा दत्ता पचकन…