लहानपण देगा देवा ……

आज एका सोशल साईटवर मला माझ्या बालवाडीतल्या मित्रांचा समूह गावला. लहानपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. ऑफिसातून घरी जाऊस्तोवर तासाभराच्या प्रवासात सगळी जुनी पाने डोळ्यासमोर भरभर येऊन गेली. गोड जुन्या आठवणीत जस मन ढवळून निघत होत आणि तस तसं चेहऱ्यावर हसू फुलत होत. रस्त्यावरची लोकं मला “आज येरवाड्यातला एक बाहेर पडलेला दिसतोय” या नजरेने बघत होती,…

पुत्रवती भव?

रात्रीचं जेवण उरकलं, टिव्हीचा रिमोट हाती घेतला आणि आवडती छत्रपती संभाजींची मालिकेच्या प्रतिक्षेत सोफ्यावर विसावलो. तसा मी फारसा काही ऐतिहासिक मालिकांच्या भानगडीत पडत नाही, कारण लहानपणी बऱ्यापैकी ऐतिहासिक कथा कादंबऱ्या माझ्या नजरे खालुन गेल्या होत्या, हे काही ‘मी खुप मोठा वाचक वैगरे आहे’ असं काही कोणाला भासवण्यासाठी मुळीच लिहीत नाही, पण हे सांगण्याचा हेतु म्हणजे,…

प्रशंसा आणि टीका

प्रशंसा पाण्यावर पडलेल्या फुलासम भावते, मोहते व कालांतराने वाहून जाते. पण टीका पाण्यात मारलेल्या दगडासम जोरात लागते, बोचते व आत खोलवर रुतून बसते.          खळाळणाऱ्या पाण्यासारखं अवखळ मन थोडं स्थिरावत, सगळं झेलत आणि झेलायलाही पाहिजेच! कारण त्याशिवाय त्याचं उदारत्व सिध्द होत नाही. पण शब्दानेही कुठेतरी थांबायला नको?                शब्दाने एकवेळ फुल नाही बनलं तरी चालतं, पण दगड…

रावणवध

रावणवध Live Match बघायला जेवढी उत्कंठा आणि मज्जा येते, तशी उत्कंठा आणि मज्जा Match चे Highlights बघायला येत नाही. त्यातल्यात्यात Live Match मधली एखादी उत्कृष्ठ Wicket, Catch, Century किंवा एखादा Six बघायचा राहून गेला असेल तर, पूर्ण Match बघितल्याचं सुख एकीकडे राहतं आणि नेमकं जे बघायचं राहून गेलंय त्या दुःखाच ओझं सुखाच्या पारड्यापेक्षा बऱ्याच पटीने…

ऑफिसच्या वाटेवर

एक मावळा आज भल्या पहाटे मनात एक अजब चलबिचल घेऊन उठला. प्रातः विधी आणि स्नान आटपून, जोरबैठका न काढताच पठ्या तडक न्याहरीसाठी चुलीजवळ येऊन बसला. “धनी! अन हे काय वो? आज इतक्यात कस वो उरकलं, गडावर लवकर पोचाच हाय का?” बायको बावरल्या स्वरात पुटपुटली. “तसं नव्ह! समद्या रात पासनं कानात नुसतं बिगुल वाजतुया! कायतरी यड…

PAIN ऑफ पेन

बॉसच्या केबिनमध्ये फाईलांची जोरदार आदळआपट चालू होती. “यु आर अबसुलटली नॉट ऐट ऑल सिरियस अबाऊट युअर वर्क!!!!! आजपण लेट???? काय चाललंय काय तुझं????? काय आज काय नवीन कारण????” हे बोलतांना लालेलाल झालेले डोळे, चेहऱ्यावर मला खाऊ का गिळूचे पाशवी भाव आणि मनात ‘आज कसा गावला लेका’ असा आसुरी आनंद बॉसच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. या…