बायंगी (भाग-५ अंतिम भाग)

मुंबईला माघारी परतत असतांनाच माझे सगळे प्लॅन ठरले. माझ्या हातात बायंगी पडताच, जणू काही माझे सगळे प्रश्न सुटले होते. डोक्यात विचारांची चक्रे बेभान होऊन फिरू लागली. काय करायचं? कसं करायचं? हे सगळं ठरवूनच माझा पाय मुंबईत पडला. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी सगळ्यात पहिले नोकरीला लाथ मारली आणि व्यवसाय करायचं पक्क केलं. व्यवसाय,…

बायंगी (भाग-४)

मी सकाळी रत्नागिरीला पोहचलो. बसस्टँडवरच फ्रेश झालो. बसस्टँडवरच झटपट नाष्टा उरकला आणि परत लांजाची बस पकडली. तास-दिडतासात लांजाला पोहचलो. बसस्टँडच्या बाहेर आलो तसा आप्पांचा शोध सुरू केला. तीन-चार दुकानात विचारपूस करून झाल्यावर; एका दुकानदाराने सांगितलं की, ‘इथून वीस किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे, तिथे आप्पा राहतात.’ उकड्यामुळे आधिच वैतागलो होतो, त्यात आप्पाचा शोध संपत नव्हता….

बायंगी (भाग-२)

दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर आवरुन, सम्या सोबत शॉपवर जायला तयार झालो. सम्याने थोडे आळोखे-पिळोखे घेतले, पण शेवटी त्याला कळून चुकलं की, मी त्याचा पिच्छा सहजासहजी सोडणार नाही. म्हणून त्रासून का होईना, शेवटी तो मला नेण्यास राजी झालाच. आम्ही दुकानावर पोहचलो. त्याच्या दुकानात काम करणारा माणिक त्याची वाटच पहात होता. सम्याने दुकानाच्या चाव्या माणिकला दिल्या….

बायंगी (भाग-१)

“माझ्या मुंबईच्या जॉबच आज फायनली पक्कं झालं रे पोट्यांन्नो.” नेहमीच्या कट्टयावर बसलेल्या मित्रांना पाहून मी मोठ्याने चिरकलो. “काय सांगतोस मक्या! मस्त काम झालं हे आणि हो रे… असं सूकं सूकं सांगतोस का?” नेहमीप्रमाणे चेत्याने पार्टीच तुणतुण वाजवलंच. “झालं काढलंच का पार्टीच खुसपट मध्येच. अरे पहिले या भोपळ्याला टुनुकटुनुक उड्या मारत मुंबईला जाऊ दे, चांगली तूप…

रहस्य वट (भाग २ अंतिम भाग)

निरजला जाग आली तेव्हा त्याचे डोळे निरभ्र आकाशाकडे उघडले. बावरलेल्या अवस्थेत तो बाजेवर ताडकन उठून बसला. समोर पाहतो तर उंच माड, त्याच्या बाजूला ढाबा आणि ढाब्यासमोर लावलेली त्याची बाईक नजरेस पडली. ढाबा मालक त्याच्या उठण्याची वाटचं बघत होता. निरजला अजूनही डोकं जड वाटतं होतं. त्याला रात्रीच्या घटनेबद्दल पुसट पुसट आठवलं आणि मग आठवला तो मंदार….

रहस्य वट (भाग १)

“मंदया चल, शेवटची रिडींग दे. आज काही संपणार नाही हे काम. साडेपाच झाले. परत निघायला हवं. ओव्हर.” थिऑडोलाइटवर (एक उपकरण) रीडिंग घेत असलेल्या निरजने, त्यापासून साधारण एक किलोमीटर दूर प्रिझम पोल घेऊन उभ्या असलेल्या मंदारला वॉकीटोकीवर सांगितलं. निरज आणि मंदार लहानपणापासूनचे जिवाभावाचे मित्र. दोघांनी एकाच कॉलेजमधून सर्व्हेइंगच (भु-सर्वेक्षण) शिक्षण घेतले. शहरातील एका नामांकित बिल्डरकडून निरज…