बादशाही पोहे

शीर्षक वाचुन थोडं बुचकळ्यात पडला असाल ना! दररोजच कांदा पोहे तर खातोच, आता त्यात “बादशाही पोहे” हा काय प्रकार बुवा ! तर या “बादशाहीयत” च्या मागे एक सुंदरता लपली आहे, ती पहीले तुम्हाला सांगतो. आमचे पिताश्री श्री किरणराव अंबेकर यांना खाण्याबाबत असे फारसे काही स्वारस्य नाही पण बादशाही पोहे म्हणजे त्यांच्या जीव की प्राण. ते…

हॉटेलातल्या भाज्या घरी बनवा

सर्वांना नेहमीच पडलेला एक प्रश्न, “ह्या हॉटेल सारख्या भाज्या घरी का नाही होत बरं?” हाच प्रश्न मी माझ्या एका हॉटेल व्यावसायिक मित्राला “बाळ्याला” (आताचा बाळूअण्णा शेठ) केला होता, त्यावर त्याने असं खोचक उत्तर दिलं “अरे लेकाच्या, दररोजच्या भाज्यांची चव, जर हॉटेल सारखी झाली तर माझ्या हॉटेलात कोण येणार रे आणि तू हॉटेलातल्या भाज्या रोज रोज…

झणझणीत मिसळ

मिसळ एक झणझणीत पदार्थ. ओह…सोssss सोssss सॉरी मुळात मिसळीला नुसतं पदार्थ म्हणणं चुकीचच. मिसळ तर एक चवदार, चटकदार आणि चमचमीत अश्या सर्व’च’संपन्न कुटुंबतील एक राजेशाही व्यंजन. मिसळला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजवैभव प्राप्त आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर अशा महाराष्टातल्या कानाकोपऱ्यात तुम्हाला मिसळीची चव एकसारखी भेटली तर नवलच. प्रत्येक ठिकाणची एक वेगळी खासियत…

काळा रस्सा

​माझ्या सारख्या सदैव भुकेल्या ढेरपोट्या समोर काळारस्याचे नुसतं नाव जरी काढलं तरी ही अतृप्त जीभ ओठांवर सैरसपाटा मारू लागते, पोटातला जठराग्नी पेटून उठतो आणि घसा नुसता लाळेचे घोट गिळतो, जीभेचे नुसते तुकडे तुकडे होऊन एक एक तुकडा हा काळा रस ग्रहण करण्यास पुढे सरसावतो​. ​पण तसं काळ्यारस्स्या बाबत हे साधारणतः सर्वांचेच हाल.​ एका गावाकडच्या घरंदाज…

कांद्याचं चुटचुटं

“मी काय म्हणतो,जे झालं असलं ते दे. मला उशीर होतोय.” “अरे, हे बघ ! पोळ्या झाल्या. कांदा पण परतला आता, फक्त बटाटे टाकुन थोडं शिजवले की झालं!….. भाजी तय्यार!” तिकडे माझ्या ‘अगं’ची मला डब्बा देण्याची तगमग, तडफड सुरू होती आणि इकडे माझी ऑफिसला जायची धुसमुस चालू होती. त्यात या कोरोनाच्या काळात ‘डब्बा राहू दे!’ म्हणणं,…

चोचले

२००६ ची गोष्ट आहे. मी एकदा कोणार्क एक्सप्रेसने भुवनेश्वरवरून पुण्याला येत होतो. ट्रेनमध्ये एक गुजराती वयस्कर जोडपं माझ्या बाजूच्या सीटवर होते. ते बोलके आणि मी तर अतिबोलका…त्यामुळे लगेच ओळख झाली. बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडची स्नॅक्सची पोटली खोलली आणि त्यातून खाकरा, ढेपला, ढोकळा सारखे एक सो एक स्नॅक्स काढले. त्यातून त्यांनी मला नेमका नको…

ठेचाऽऽ

“आयऽआयऽऽआयऽऽऽआयऽऽऽ मिरची लागली मिर्ची ! पाणी दे पाणी…हाऽऽऽहुसऽऽऽहाऽऽऽहुसऽऽऽ” “झेपत नाय तर खातो कशाला रे भुसनाळ्या! आता बोंबोलतो ते बोंबोलतो, सकाळी डेचकी घेऊन जातो तव्हापण कोकलतो. बंद कर ते ठेचा खाणं.” “काय क्राव तात्या, ठेचा नसला तर काय ग्वाड लागत नाय अन दिसला की जिभेवर ताबा ऱ्हातो व्हय.” लहानमुलाने भान हरपून कॅडबरी खावी, एवढं एकचित्त होऊन…