बाबा

आम्ही मागितले खेळणं,ते आमच्या सोबत तासनतास खेळले,आम्ही मागितले कपडे,त्यांनी मात्र फाटक्या बनियानीवर वर्ष काढले, आम्ही मागितले स्कुटर,ते सायकलीवरच रोज गावभर फिरले,आम्ही मागीतले शिक्षण,त्यांनी मात्र तीन-तीन शिफ्टमध्ये दिवस काढले, आम्ही मागतच राहिलो,आणि ते नेहमी भरभरून देतच राहिले,आम्ही लहानाचे मोठे झालो,पण ते मात्र आमच्या बालपणातच रमले. प्रश्न नव्हता गरिबीचा कधीच,ना कधी प्रश्न होता पैशांचा,त्यांच्या छोट्या छोट्या तडजोडीत,तो…

माणुसकी

आज चक्क वसंतात, काळोख दाटलाय नभी,आज पहिल्यांदाच पाहिली, भिजलेली गुढी, अजून बरंच काही पहिल्यांदाच, बघायला भेटणार,सृष्टीचा कोप सारा, तुझ्या अहंमला भेदूनच थांबणार, फक्त तुझेच स्वनिर्मित संकट हे, आज तू भोगतोय‘सबकुछ झूट’ म्हणत,मग परमात्म्याला का कोसतोय? जात-पात, उच-नीच, नीती-अनीती हे फक्त तुझं अज्ञान,वेळीच विझव, हे ‘माणसानेच माणसासाठी’ पेटवलेलं रान, भूकंप, पूर, महामारी अश्या परीक्षांचा सृष्टी घाट…

मन

कशी सांगु देवा तुलामाझ्या प्रेमाचीया कथा,कशी कळेल या दगडालामाझ्या मनाचीया व्यथा. प्रेम आहे मृगजळ,कळतंय या मनाला,पण तूच ना रे शिकवलंखेळ ह्यो खेळाया. आता कसं करू शहाणंया कोवळ्या मनाला,अवघड तारेवरसमतोल राखायाला. आता तुच ये समोरी अनंसमजवं या मनाला,प्रेमच्याच पाई तर तुनंदगडात ढाळल स्वतःला. मंगेश उषाकिरण अंबेकर