सॉफ्टकोपी

काही काही बायका किती भाबड्या असतात यावर विश्वासच बसत नाही. हो, हो! मी भाबड्याच म्हणलो, बबड्या नाही. उगाच विषयाला भलतीकडे वळण नको. खरं सांगायचं झालं तरं नित्यनियमाने “ह्या बबड्याने वीट आणलाय नुसता!” असं उच्चारानेच या मालिका नित्यनियमाने का पाहतात? हा मोठा गहन व भाबडा प्रश्न मला पडतो. बरं इथपर्यंत ठीक आहे हो! पण काही बायका…

बापमाणुस

“मला ते काय माहीत नाही. बाबा मला स्पोर्ट बाईक पाहिजे म्हणजे पाहिजेच.” मानस आज हट्टाला पेटला होता. “हे बघ मला आता खरचं झेपत नाही. पोस्टग्रॅज्युएट होऊन आता वर्ष झालय तुला, तेव्हा तू कामाचं बघ आणि तुला वाट्टेल ते घे.” श्यामराव अगदी सणसणीत उत्तरले. “या इथे..मला काय काम भेटणार? मला नोकरीसाठी शहरातच जावं लागेलं आणि तसही…

बायंगी (भाग-३)

मी दुसऱ्या दिवशी मुंबई गाठली आणि नोकरीवर रुजू झालो.पहिल्या दिवशी ऑफिसातील ओळख, परिचयाची औपचारिकता संपवून; डोक्यावरच्या छप्परची व्यवस्था करण्यासाठी ऑफिसातून लवकर बाहेर पडलो. तसं माझं राहण्याचं ठिकाण ठरलेलंच होतं. सम्या रहायचा तिथं जवळच बॉईज हॉस्टेल होतं. तिथं राहण्यामागे माझे दोन उद्दिष्टे होती. एकतर तिथून ऑफिस जवळ होतं, दुसरं म्हणजे सम्या गायब होण्यामागे काहीतरी गूढ नक्की…

बायंगी (भाग-१)

“माझ्या मुंबईच्या जॉबच आज फायनली पक्कं झालं रे पोट्यांन्नो.” नेहमीच्या कट्टयावर बसलेल्या मित्रांना पाहून मी मोठ्याने चिरकलो. “काय सांगतोस मक्या! मस्त काम झालं हे आणि हो रे… असं सूकं सूकं सांगतोस का?” नेहमीप्रमाणे चेत्याने पार्टीच तुणतुण वाजवलंच. “झालं काढलंच का पार्टीच खुसपट मध्येच. अरे पहिले या भोपळ्याला टुनुकटुनुक उड्या मारत मुंबईला जाऊ दे, चांगली तूप…

आत्मनिर्भर

“मंजिरी नाव हिचं. बीएड केलं आहे. कशी वाटते तुला?” व्हरांड्यात लॅपटॉपवर स्थळ शोधत बसलेल्या बाबांनी विनयला एक स्थळ सुचवलं. विनयने हातातला चहाचा कप बाबांना दिला. “बाबा, निदान या लॉकडाऊनमध्ये तरी मुली दाखवायचं थांबवा हो.” ” लॉकडाऊन संपल्या संपल्या तू कोणी सून म्हणून माझ्यासमोर उभी करणार असेल, तर मी हे सगळं आत्ताच बंद करतो बघ.” लग्नाचा…

आता ऐका रेडिओवर

पुस्तक वाचायचाही कंटाळा आलाय…. मग आता रेडिओवर पुस्तक ऐका. माझी रेडिओवरची पहिली ऑडिओ कथा. Happy to share with you My First Audio Book released on FM. Thanks to Kuku FM team & RJ Maya. Listen to the  Audio Book Runanubhandhhttps://applinks.kukufm.com/9hThK2VPZPt76X818

1BHKRequired

“Urgently Required 1BHK for Couple” रविवारच्या आळसावलेल्या सकाळी, सोफ्यावर उताणा झालेल्या मकरंदने ग्रुपवर आलेला मॅसेज वाचला आणि त्याचे सुस्तावलेले डोळे पूर्ण उघडले. “आता एवढा मोठा 3BHK असतांना, याला कशाला हवाय 1BHK…. असो कदाचित मित्रासाठी हवा असेल” आपला खास मित्राला ‘का? कसा? कोणासाठी?’ असा कुठलाच “क” श्रणीतला प्रश्न न करता, मकरंदने काल एका मार्केटिंग ग्रुपवर आलेला…

व्रण

सकाळी साडेसात वाजता वर्ग भरला. खिडकीतून आत डोकावणारं सोनेरी कोवळं ऊन, वर्गात सर्वत्र प्रसन्नता पसरावत होतं. भिंतीवरचा गडद काळा फळा झळाळी दिल्यासारखा स्वच्छ पुसलेला आणि त्यावर कॅलिग्राफीपेक्षा सुंदर अशा वळणदार ठळक अक्षरात लिहलेलं होतं “जागतिक महिला दिन”  आज दिनांक ०८ मार्च १९९९. काळ्या रिबीनने बांधलेल्या दोन झुपकेदार वेण्या, कमरेत स्टीलचे बक्कल असलेला ईलास्टिकचा बेल्ट, पायात…

खुळखुळा

“हुश्शsssश्श संपला बुवा आजचा दिवस कसाबसा. आता मस्त दोन महिने सुट्टी. उद्याचा दिवस फक्त आराम आणि परवा सकाळीच भुर्रर्र. कधी एकदाचा मृणालला भेटतो असं झालय. बस फक्त हा पाऊस थांबायला हवा बाबा. वीट आणलाय नुसता याने. दिवाळी आली तोंडावर पण याचा थांबायचा काही नेम नाही. ” सलग पंधरा-सोळा तास काम करून, आहे त्या कपड्यात बिछान्यावर…

ऋणानुबंध (भाग-सहावा)

ऋणानुबंध – भाग-सहावा दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा आणि सोहम नाष्ट्याच्या टेबलावर दामलेंची वाट बघत होते. सोहम घरात चाललेल्या सर्व घडामोडीतुन अनभिज्ञ आपआपल्या दिनचर्येत मशगुल होता. प्रत्येक दुखण्याला गोळी असते पण मनाच्या बैचैनीला कोणतीच गोळी असर नाही करत. झोपेची गोळी घेऊन झोपलेले दामलें उलट नेहमीपेक्षा आधिच उठले आणि तय्यार होऊन खोलीतच पुस्तक घेऊन उगाच पान चाळत…