माझ्याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर,
“कथा, लेख , चारोळया अस बरच काही लिहितो,
पण
स्वत:बद्दल लिहण्यास माझा ‘मी’ कमी पडतो.”
पाळण्यापासून ते अभियंतापर्यंतचा माझा बौध्दिक, शैक्षणिक, जडणघडणाचा प्रवास औरंगाबाद शहरात झाला. पुढे पुण्यातून स्थापत्य व्यवस्थापनशास्त्र (एम.बी.ए) शिकून नोकरी करत भारतभर फिरलो आणि आता मागील बारा वर्षापासुन पुण्यात येऊन विसावलो. सध्या मी पुण्यातील एका खाजगी क्षेत्रात प्रकल्पप्रबंधक म्हणून कार्यरत आहे.
लहानपणी आर्थिक तडजोडीत राहून गेलेल्या कला क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी जसे की चित्रकला, नृत्य, संगीत आणि लिखाण आता पूर्ण करू पाहतोय. तसा मी सवड भेटलं तसं कविता, प्रवासवर्णन, लेख लहानपणापासून करत होतो पण त्याच्या सीमा फक्त माझ्या आणि लग्न झाल्यावर माझ्या सौभाग्यवती पर्यंतच सीमित राहिल्या. पण जिवलग मित्रांच्या आणि कुटुंबातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे; गेल्या काही वर्षापूर्वी मी सोशल मिडियावर व्यक्त होत गेलो. वाचकांनी दिलेल्या अनपेक्षित प्रशांसापूर्वक अभिप्रायामुळे लिखानातली उर्मी वाढत गेली.
या प्रतिसादाच्या बळावर मी मराठीबोली, स्टोरीमिरर मराठी, साहित्यदरबार , झीमराठी मानाचं पान या सारख्या नामांकित कथास्पर्धेसाठी पाठवलेल्या आणि वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या कथांना वेळोवेळी भरगोस पारितोषिके मिळाली.
मी लिखाण जे काही छोटेखानी योगदान करू शकलो ते फक्त रसिक मायबाप वाचकांमुळेच. त्यांनी नेहमीच माझा हुरूप वाढवला आणि यासाठी मी त्यांचा आजन्म आभारी राहील.
प्रत्येक वाचकाचा अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे, कारण त्यातूनच मला माझ्या चुका सुधारण्याची संधी भेटते. तुमच्या आशीर्वादरुपी अभिप्रायाच्या सदैव प्रतिक्षेत असणारा…….
मंगेश उषाकिरण अंबेकर
मंगेश उषाकिरण अंबेकर
9823963799
You are great writer…your story is base on real topics and that’s why I really like it… 😊👍
LikeLike
Thank you so so much dear. 🙏😊
LikeLike