हॉटेलातल्या भाज्या घरी बनवा

सर्वांना नेहमीच पडलेला एक प्रश्न, “ह्या हॉटेल सारख्या भाज्या घरी का नाही होत बरं?”

हाच प्रश्न मी माझ्या एका हॉटेल व्यावसायिक मित्राला “बाळ्याला” (आताचा बाळूअण्णा शेठ) केला होता, त्यावर त्याने असं खोचक उत्तर दिलं “अरे लेकाच्या, दररोजच्या भाज्यांची चव, जर हॉटेल सारखी झाली तर माझ्या हॉटेलात कोण येणार रे आणि तू हॉटेलातल्या भाज्या रोज रोज खाणार सुध्दा नाही रे गबदुल्या”
(सर्वांचं वाढत्या वयानुसार नावात कसं मोठेपण येत, जस की शेठ, साहेब, दादा ई., आमचं मात्र वाढत्या पोटानुसार नावात विशेषण आलीत , काय तर म्हणे गबदुल्या….ग..ब..दु..ल्या शे..शे)

असो, तसं बाळ्याकडून हेच उत्तर अपेक्षित होत म्हणा, तरीपण मी आपला हावरट बाणा तसाच पुढे चालू ठेवत तोच प्रश्न परत त्यापुढे वेगळ्या स्वरूपात मांडला “बाळूशेठ ! तरी पण तू करतोस तरी काय रे ? अरे तुझ्या हाताला जी चव आहे ती खरचं अद्वितीय यार”

बाळ्या मिश्किलपणे आपल्या मिश्यावर ताव मारला अन बेडकावाणी हलकस फुगला. मला वाटलं ‘झालं आपलं काम फत्ते’ , पण एवढ्यावर भाळणार तो बाळ्या कसला.

खरतर बाळ्या तसा बालपणापासूनच सुगरण कॅटेगारीतला, प्रत्येक बाईच्या स्वयंपाकाला लाजवेल अशी त्याच्या हातची चव आणि अशी त्याची ख्याती

दोन-तीन किलो(तास) लोणी लावल्यावर, बाळ्या शेवटी बाटलीत उतारलाच….आणि मग त्याने कुठे ह्या रेसिपज दिल्या. (बघा किती प्रयत्नांची पराकाष्ठा तुमच्यासाठी ही 😀 😀 :D)

जर दररोजच्या भाज्यांची चव वाढवायची असेल, तर खालील सोप्या ग्रेव्ही रेसिपीज नक्की वापरून बघा.

१. पालक रस्सा

पालक उकडून बाजूला ठेवा. त्यात परतलेला कांदा, लसूण, आलं, मिरची, टोम्याटो ची पेस्ट करा. एक प्यान मध्ये तेल घेऊन जिरे हिंग जोडणी करून त्यात कांद्याची पेस्ट परतून घ्या त्यात त्यात उकडलेला पालक पेस्ट घालून त्यात मीठ आणि गरम मसाला घालून शिजवा.

२. पांढरा रस्सा

भीजवलेली खसखस व काजू, बडीशेफ, वेलदोडे, लवंग आणि दूध घालून पेस्ट करून घ्या. एका प्यान मध्ये तूप घेऊन जिरे आणी दालचिनी तुकडा घालून फोडणी करा. त्यात काजू-खसखस ची ग्रेव्ही घालून शिजवा शेवटी थोडं आजून दूध घालून उकळा आणि ग्रेव्ही तयार.

३. झटपट रस्सा

कांदा, लसुन, आलं, हिरवी मिरची आणि टोम्याटो बारीक करून त्यात बडीशेप पावडर, तिखट, जिरे, हिंग, धने पावडर, हळद आणि गरम मसाला घालून शिजवा.
किंवा
कांदा उकडून पेस्ट करून त्यात वरील सगळे साहित्य घालून पण पेस्ट करता येईल.

४. बिना कांदा लसूण रस्सा

खोवलेला नारळ, भिजवलेली खसखस, आलं, मिरची, काजू पेस्ट, टोम्याटो पेस्ट एक प्यान मध्ये फोडणी करून त्यात वरील मिश्रण घालून थोडं मीठ घालून शिजवा.

५. टोमॅटो रस्सा

टोम्याटो प्युरी, तिखट, धने पावडर, बडीशेफ पूड, हळद, थोडी साखर, फ्रेश क्रीम, कसूरी मेथी, टोस्ट चा चूरा मीठ फोडनित घालून शिजवून मस्त ग्रेव्ही तयार करा.

६. हिरवाई

दही, तिखट, हळद, धने पावडर, हिरव्या मिरची ला नीट मिक्स करून तुपाच्या फोडणीत जिरे, हिंग घालून त्यात मिश्रण टाका आणी शिजवा त्यात मीठ आणी कोथिंबीर टाका.

तर नक्की करून बघा, सगळं जुळून आलं तर पुण्यकर्म माझे, बाकी तुम्ही बाळ्याला ह्या ग्रुपवरच शिव्या घालू शकतात (कारण तो ह्या ग्रुपवर अजून तरी नाही 😀 😀 😀 )

पण खरच करून बघा मला सर्व आवडल्या, तुम्हाला पण नक्की आवडेल.

जिते रहो….. सदा खाते रहो 🙂

मंगेश उषाकिरण अंबेकर
०२ एप्रिल २०१७

९८२३९६३७९९

आपला अभिप्राय नक्की कळवा. आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे…..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.