सकारात्मक

भगवंताने एक सुंदर जीवन आपल्या ओंजळीत टाकलंय. या सुंदर जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं तर सगळंच मनोहरी, रमणीय आणि सकारात्मक दिसतं…. मग आपली झोळी भरलेली असो की फाटकी.

आणि जेव्हा दृष्टीकोन सकारात्मक होतो तेव्हा……भरगच्च वर्दळीपलीकडे रंगबेरंगी फुलांची फुललेली बाग दिसू लागते…. तोकड्या अवस्थेत जगणाऱ्या चेहऱ्यावरही खळखळून ओसंडनारा आनंद दिसू लागतो….थकून भागून घरी पोहचलेल्या देहाला चिमुकल्यामधला सळसळणारा उत्साह दिसू लागतो…. मावळतीच्या सूर्याप्रकाशातही न्हाहून निघालेलं निसर्गरम्य आकाश दिसू लागते….निरव शांत रात्रीत, लुकलूकणाऱ्या चांदण्याचा लपंडाव दिसू लागतो…… आणि दिसू लागतो तो… सुर्योदयाच्या तेजात होऊ घातलेला…. तो नवं चैतन्याचा जन्म……

आज कितीही संकटं,महामारी,नैराश्य दारी उभारलेलं असलं तरी तिमिरातून तेजाकडे, अधोगतीतून उत्कर्षाकडे, असत्यातुन सत्याकडे, निर्गुणातून सगुणाकडे आणि नश्वरतेतून शाश्वत्तेकडे असा सृष्टीचा प्रवास ठरलेला आहे आणि तो अविरतपणे चालूच राहणार. गरज आहे ती फक्त थोड्या संयमाची. आपले विचार सकारात्मक ठेवलं तर अवघड काहीच नाही…. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे….त्याचा सर्वोतोपरी आनंद उपभोगा…. आणि तो सर्वांसोबत वाटा.

मंगेश उषाकिरणअंबेकर
०९ मे २०२०

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.