पुण्यमृदा (भाग-सहावा आणि सातवा)

(भाग-सहावा)

एका दिवशी अचानक,

“मीरे यातली तुला कोणती साडी आवडली सांग पटकन” मीराच्या बाबाने विचारले.

“अय्या …. किती भारी….बाबा मला ही आवडली” मीराने लगेच आपली आवड कळवली खरी पण पुढच्या क्षणाला तिच्यात डोक्यात संशयाची पाल चुकचुकली.

“बाबा पण का हो….ह्या साड्या कोणासाठी? मी तर काही साडी घालत नाही?'”

“अग वेडे तुला बघायला उद्या पाहुणे येणार होते.” बाबाने हे सांगताच मीराच्या अंगातला त्राणच गेला ती तसच्यातशी पलंगावर बसली.

बाबांना काही बोलावं, काही सांगावं याची तिला हिम्मतच होईना आणि सांगणार तरी कशी, जवळपास महिना होतं आला होता, ना अर्णबचा काही पत्ता ना मामांचा काही ठिकाणा. वाट पाहून पाहून मीराचा जीव अगदी मेटाकुटीस आला होता.

मीरा शांत राहिली…..

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पाहुणे बघायला आले. मीरा नाईलाजाने त्यांच्या समोर जाण्यास भाग पाडल्या गेली. ओढवलेली वेळ निभावून नेण्याशिवाय तिच्याकडे पर्याय उरला नव्हता. आलेलं स्थळ मीराच्या बराबरीचच होत. बोल-चाल झाली, बघणं झाल आणि एकदाच कार्यक्रम तासाभरात उरकला. पसंती कळवतो सांगून पाहुणे निघून गेले.

पसंती कळवतो म्हणजे काही पक्क नाही अस मनोमनी मीराला वाटू लागलं आणि ती थोडी सुखावली. पण इकडे अर्णबला भेटीसाठी तिला काय करावे ते काही सुचेना.

शेवटी मीरा कारखान्यात गेली आणि तिथे मामांची विचारपूस केली पण तिथेही यांचा काहीच निरोप नव्हता. मीरा आता पार तुटून गेली.

तिला आता वाटू लागले की बाबांना अर्णबबद्दल सगळं सांगून टाकावं पण सांगणार तरी कशी ज्याबद्दल काही सांगायचं त्याच काही थांगपत्ताही नव्हता त्यातल्यात्यात भर म्हणजे त्यांचं सगळंच वेगळं भाषा,गाव, चालीरीती. जे बाबांना मुळींच पटण्यासारखे नव्हतं.

तिकडे दोन दिवसांनी पाहुण्यांचा पसंतीचा निरोप आला. आणि आता मीराच्या बाजूने सगळी सूत्रे उलटी फिरू लागली….. मांडलेला सर्व डाव विस्कटू लागला. मीराच्या जीवाची घालमेल काही संपेना.

क्रमशः

===================

पुण्यमृदा (भाग-सातवा)

मीरा सकाळी बाल्कनीत तुळशीला पाणी वाहत होती, तेव्हा तिला अर्णबचे मामा येतांना दिसले. तिच्यासाठी ही सकाळ एक आस घेऊन आली होती. त्यांना बघून तिच्या मरगळलेल्या आशा परत पल्लवित झाल्या. ती थोडया वेळाने मामाच्या खोलीवर गेली.

“अरे मीरा बेटा, केमॉन आच्छे! कैसे आना हुवा” मामा मीराला आपल्या दारात बघून विचारले.

“मी ठीक आहे, तुम्ही कशे आहात? कधी आलात? अर्णब कसा आहे? तो कधी येणार? फार दिवसांनी बघितलं तुम्हाला म्हणून विचारपूसकरायला आले.” मीराच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. तिला कायकाय विचारू आणि काय नाही अशे झाले.

“उडी बाबा, रुको तो जरा कितने सवाल कर रही हो तुम? मैं अभीअभी आया हु।” मामा मीराचे एकामागून एकप्रश्न ऐकून दचकले.

“सॉरी मामाजी ” मीरा माफी मागुन थोडी थांबली.

“अर्णब….वो क्यू आयेगा यहा अब, मैं भी वही जा रहा हूँ, बस सामान लेने आया हूँ” मामांच्या या वाक्यावर मीराच्या पायाखालची जमीनच सरकली.

“काय ?…… का मजाक करता मामा माझ्याशी.” मीरा बिचकत बिचकत उत्तरली.

“अरे नही बेटा सच में……” मामा त्याच्या बोलण्यावर ठाम होता.

“मामा माझं लग्न लावून दिल्या जाणार आहे, मी आधीच खूप वैतागलेली आहे, त्यातअशी माझ्याशी मजाक करू नका.” मीरा पूर्ण हतबल होऊन बोलली.

“मजाक…..मैं क्यू करू तुमसे मजाक” मामा एकदम उस्फूर्तपणे बोलला.

मामाला मीरा आणि अर्णबच्या प्रेमाबद्दल संगण्यावाचून आता गत्यंतर नाही राहिलं. तिला चालून आलेल्या स्थळाबद्दल पण कल्पना दिली. अर्णबने प्रेमात केलेली सगळी वचनं सांगितली. त्यावर मामा आश्चर्यचकित होण्याऐवजी हसू लागला. मीराला गोंधळून गेली, तिला त्यांच्या हसण्यामागच काही कळेना वाटलं.

“हसताय कशाला, मी तुम्हाला खोटं सांगतेय अस वाटतंय काय?….बोला…” मीरा आवाज चढवून बोलली.

“सॉरी बाबा सॉरी…..लेकीन अर्णब के बारे मैं क्या तुम कुच्छू जानेना? बेटा अर्णब मेरा भाईपो , भांजा है लेकीन मुझे तुम्हे बताने बडी शर्म महसुस हो रही है की अर्णब एक लफ़ंगा किस्म का लडका है, उससे जितना दूर रहोगी उतना अच्छा…..

हमारे गाव मे ऐसे ही दो, तीन लडकियोसे चक्कर था इसलिए उसके बाबाने उसे यहा मेरे साथ भेजा था। पर बेटा तुम उसके चक्कर में कैसे आ गई। सुना है उसने दो लडकियो कर साथ कुछ उलटासीधा भी कर दिया था। तुम्हारे साथ तो कुछ नही किया ना।” मामाने तिला अर्णब बद्दल सांगून पूर्ण हादरून टाकलं. मीराच्या अंगात आतातर त्राणचं राहिला नाही, तिची शुध्द हरपली आणि ती जागीच दारात कोसळली.

तिला असं बघून मामाही गडबडले आणि त्यांनी तात्काळ तिला घरात आणून पाणी पाजले आणि थोडे पाणी तिच्यावर शिंपडले.

मीरा थोडी शुद्धीत आली आणि तिने मामाला विचारले, ” जर हे खरं असेल तर बाबांची आजाराची बातमी पण त्यानं खोटी आहे की काय? आणि तुम्ही कशासाठी गेले होते”

“बाबा……किसके बाबा…..उसके बाबा तो पुरी तरह ठीकठाक है, और मैं तो कोलकता यहा के मूर्तीयो की बिक्री के लिए गया था, मैने नया कारोबार जो शुरू किया है वहा ” मामाचं बोलणं मीराला हेच सांगत होत की ती अर्णबच्या जाळ्यात पूर्ण गोवल्या गेलीय.

मीरा तिथून रडत रडत निघून गेली. तिला विश्वास बसतं नव्हता की अर्णब तिच्या सोबत असं करू शकतो. अर्णबला दोष देत मीरा स्वतःला हरवून बसली. अर्णब तिच्यासोबत अस काही करू शकतो ह्याची तिला अजिबात कल्पना नव्हती. ती आत्महत्येच्या टोकाच्या निर्णया पर्यंत जाऊन पोहचली. फक्त एक आस राहिली होती ती म्हणजे अर्णब सोबत एकदा बोलायची. तिने मामा फक्त एकदा त्याला फोनवर बोलणं करून द्या एवढी विनंती केली. मामाने तिला एक जवळचा फोन नंबर देऊन अमुक अमुक दिवशी फोन करायचा सांगितला.

ठरल्या प्रमाणे मीराने मामा कोलकत्याला गेल्यावर फोन केला, त्यावर तो फोन मामाने उचलला आणि अर्णबला तुझ्याशी बोलायला मुळींच तय्यार नाहीये म्हणून सांगितलं.

मीराची शेवटीची आस पण पूर्णपणे धुळीस मिळाली होती. ती भांबावून गेली. काय करावं ते तिला काही सुचेना.

मामाने तिला समज देत, तिला तिच्या बाबांचा विचार करायचा सांगितला आणि तिच्यासमोर जे स्थळ येऊन ठेपल आहे त्याचा विचार करायला सांगितला.

तिला आता जगण्यात काही अर्थ वाटत नव्हता. ती फक्त एक चालतंबोलतं निर्जीव शरीर होऊन बसली होती. तिच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक उरला नाही.

अखेरीस स्वतःच्या बाबांच्या विचारापाई तिने आत्महत्येचे विचार बाजूला सारले आणि बाबांच्या इच्छेखातर त्यांनी सूचवलेलं आहे ते स्थळ कन्याधर्म कर्तव्याला जपत स्वीकारल. काही दिवसातच तिचं लग्न पार एकदाचं पडलं आणि कडू आठवणींच्या त्या चाळीशी तिचं नातं तुटलं……

क्रमशः

================●◆●=================

©मंगेश उषाकिरण अंबेकर

●९८२३९६३७९९

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.