पुण्यमृदा (भाग-चौथा आणि पाचवा)

अर्णबच मीरावर खरचं कितपत प्रेम होतं याची कल्पना त्यालाच नव्हती. पण त्या दिवसापासून त्याबद्दलची सर्वच समीकरणं बदलेली होती. मीराबद्दल त्याच आकर्षण जास्त वाढलेलं होतं. पहिले मीरा वाट बघायची आता अर्णब तिची वाट पाहू लागला होता. तो तिच्या हळूहळू जास्त जवळ येऊ लागला होता.

कधी तिला हात सुध्दा न लावणारा अर्णब, तिचा हात हातात घेण्यासाठी, तिच्या जवळ बसण्यासाठी, तिचे गालगुच्चे घेण्यासाठी, हापालेला असू लागला. लगट करू पाहू लागला. त्याला स्वतःत झालेला बदल जाणवत तर होता पण हा नेमका कशाचा परिणाम हे काही त्याच्या लक्ष्यात येत नव्हते. पण इकडे मीराला त्याच्यात झालेला बदल पूर्णपणे जाणवत होता आणि क्षणोक्षणी ती त्याला बाजूलाही सारत होती.

“वो देखो वो कैसे एकदुसरे के गलेमे हाथ डाले बैठे हैं, और वो दोनो तो देखो……उसकी गोदी मे सिर रखकर लेटा हुवा हैं। कितने मस्त लग रहे है दोनो।” अर्णब चौपाटीवर त्यासोबत अर्धाफूट लांब बसलेल्या मीराला सांगत होता.

“हम्मम…मग काय?” मीराने अर्णबकडे बघत प्रश्न केला.

“मग क्या….मग क्या…बोले तो….आवो ना नजदीक जरा, क्या तुम्हे नही लगता की हम भी उन्ही मे से एक है”

“नाही….बिल्कुल नाही…..त्यांचा एकतर साखरपुडा झालेला असेल नाही तर लग्न झालेलं असेल….आपलं तसं काय आहे कुठे?”

“साकरपुडा? ये क्या होता है?” अर्णबच्या या निरागस प्रश्नावर मीरा खदखदून हसली.

“हम्मम्म…..साखरपुडा….. बोले….. तो…..हा शुगरबॉक्स” मीरा असं बोलून अजून हसू लागली.

“शुगरबॉक्स क्या ये शुगरबॉक्स” अर्णब वैतागला.

“अरे मेरे भोले बाबू ……. साखरपुडा का मतलब उनकी सगाई हुई होगी,क्या तुम करोगे मुझसे शादी?” मीराने समजवून सांगत तिच्या मनातला प्रश्नपण एकदाच विचारून टाकला.

“हट…..पगली हो क्या…..ऐसा थोडीना होगा, बिना सगाईवाले भी होगे ही ना, सब थोडीना यहा पे सगाई करके आये होगे” मूळ प्रश्न बाजूला सारत अर्णब उत्तरला.

“ठीक आहे….नसतील ही तसे….पण आमच्यात हे सगळं लग्न ठरल्यावरच चालत, बोल ना तु करणार आहेस का लग्न…..” मीरा परत त्याला मूळ प्रश्नावर आणत बोलली.

अर्णब निरुत्तर झाला तिच्या प्रश्नावर नेमकं काय उत्तर द्यावं ते त्याला कळत नव्हतं. तो एकदम शांत झाला.

“क्या सोच रहे हो बाबूमोशाय…..जवाब नही है ना तुम्हारे पास आज त्याच्याकडून खरं काय ते जाणुन घेण्यासाठी मीरा जिद्दीला पेटली होती.

एवढं ऐकून देखील अर्णब एकदम चडीचूप होता.

“नही जमेगा तुम्हे…..चलो छोडो तुम इस बात, प्यार करना कोई आसन बात नही” मीराच्या उचकवण्यावर शेवटी अर्णब पेटून उठला आणि बोलता झाला.

“तो…तो…….तो फ़िर ठीक है ना, मैं भी बात करता हूँ अपनी शादीकी आमार मामा से…..तब तो भालो आछे” अर्णब बोलून तर गेला खरी, पण त्याच्या बोलण्यात जी धमक हवी होती ती मुळीच नव्हती.

“खरचं, तू बोलणार आपल्या विषयी” मीराला एकदम गहिवरून आलं. तो खरच विचारणार का हे तिला माहीत नव्हतं पण त्याच्या बोलण्याने मात्र तिला फार आनंद झाला.

क्रमशः

=========

पुण्यमृदा

(भाग-पाच)

रात्री अर्णब घरी पोहचला तेव्हा मामा गडबडीत सुटकेसमध्ये कपडे भरत होता. अर्णब ते बघून थोडा बुचकाळ्यात पडला, त्याने मामाला विचारले असता, मामाने अर्णबला त्याचे वडील आजारी असल्याची बातमी दिली. अर्णबच्या मनात धस्स झालं, डोळे पाणावले, त्याने लागलेच आत जाऊन आपली बॅग भरायला सुरुवात केली. अर्णबच त्याच्या वडीलांवर खूप प्रेम होत.

मामाने त्याला थांबवलं, त्याला धीर देत त्याला बसवलं आणि सांगितल की, घाबरण्यासारख अस काही झालेलं नाहीये, आपण एकटेच जाऊन चार-पाच दिवसात परत येतो. पैश्याची गरज पडली तर काही कमी पडायला नको म्हणून तातडीने कोलकात्याला निघालेलं बर. परत सणाचे दिवस जवळ येत असल्यामुळे, कोणा एकला तरी कारखान्यात मदतीला थांबणं गरजेचे आहे असं सांगून अर्णबला तिथंच राहायचं सांगितलं.

दुसऱ्या दिवशी मीरा अर्णबने मामांना आपल्या विषयी सांगितले का नाही याबाबत तिच्या मनाची घालमेल सुरू होती. कधी अर्णबला भेटू अस तिला झालेलं. पण इकडे अर्णब कारखान्यावरून आला तरी भेटला नाही म्हणून मीरा बैचेन झाली. अखेर ती त्याला बघायला वर त्याच्या घरी गेली.

अर्णबने तिला आपल्या वडीलांच्या आजारपणाची बातमी सांगता-सांगता अचानक धायमोकळून रडायला लागला. मीराने त्याच्या जवळ गेली आणि त्याला शांत करत, धीर देत सावरलं. तिने जेव्हा त्याच्या डोक्याला हात लावला तेव्हा तिला कळलं की त्याच अंग तापाने फनफनलय. ती तात्काळ गेली आणि डॉक्टरांना घेऊन आली. डॉक्टरांनी तपासलं, सर्वकाही व्यवस्थित होईल म्हणून सांगितलं आणि काही औषधी आणायला सांगून दोन दिवस काळजी घायची सांगितली.

पुढचे दोन-तीन दिवस मीरा रोज सकाळ-संध्याकाळ त्याची जेवणाची आणि औषधाची काळजी घेण्यासाठी त्याच्या घरी येऊ लागली. अर्णबलाही तिचा सहवास खूप हवाहवासा वाटू लागला. ते या दोन तीन दिवसात जेवढे जवळ आले तेवढे पूर्वी कधीच आले नव्हते. त्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे मीरा त्याचा घरी आली आणि त्याकडे अचानक परत तोच प्रश्न फेकला.

“अरे बाबूमोशाय तुम्हे एक बात तो पुछना मैं भूल ही गयी, तू मामांना आपल्याबद्दल विचारणार होता त्याचं के झालं?” मीराने अर्णबला विसर पडलेल्या गोष्टीची आठवण करून दिली.

अर्णब काही क्षणांसाठी अबोल झाला आणि थोडा विचारकरून, ” अरे बाबा ….. मैं तो उसी दिन घर आकार सब बतानेवाला था, लेकीन जैसेही घर आया तब मामाने मुझेही बाबा की खबर बताई”

“असं……मला वाटलं तू काही विचारणार नाही”

“हा बाबा मालूम है की तुम्हे बैगर शादी किए छुना मना है, जैसे की तुम कोई चारसौ चालीस वोल्ट का टॉवर हो” अर्णब मिश्किलीत मीराला खिजवू पाहत होता.

“मग काय…..तुमच्यासारखे परदेसी सगळं काही करतात आणि मग आपपल्या गावी पळून जातात, काय खरं आहे का तुम्हा लोकांचं.”

“परदेसीयोपे इतनाभी भरोसा नही था तो प्यार भी क्यू किया”

“वही तो….क्या कल आई हुई उस फिल्म का गाणा नही पता…..प्यार किया नही जाता हो….जाता है….दिल दिया नही जाता को जाता हैं……” मीरा गाण गुणगुणत त्याच्या जवळ गेली. पलंगावर झोपलेल्या अर्णबने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढले…….तिने स्वतःला सावरत ‘नको नको म्हणतं’ दूर झाली आणि बाहेर पडण्यासाठी दाराकडे वळली. अर्णबच्या डोळ्यात वेश्यालयात पाहिलेली कामईच्छा ओसंडून वाहत होती.

त्याने परत तिला त्या जवळ ओढलं आणि तिने त्याला जोरदार प्रतिकार केला आणि “लग्नाशिवाय हे बरं नाही” म्हणतं मीरा दरवाज्याकडे पोहचली.

अर्णबची बुद्धी दुसरं काही विचार करण्याच्या पलीकडे पोहचली होती. तो ताडकरून जागचा उठला आणि मीराला बाजूला करत दार बंद केलं.

“अब क्या शादी तो करनी ही है, क्या तुम्हे अपने प्यार पे जरा भी ऐतबार नही, यही प्यार है क्या तुम्हारा” अर्णब लटक्या रागात येऊन मीराला उचकवण्याचा शेवटचा प्रयत्न केला आणि परत जाऊन पलंगावर निवांत पहुडला.

“नाही रे ….पण हे इतक्यात बरं नाही” मीरा त्याच्या जवळ जावून त्याला समजवन्याचा प्रयत्न करू लागला.

अर्णबने मीराला पुन्हा अलगद हिसका देत तिला आपल्यापाशी ओढलं. मीरा त्याच्या पोटापाशी ओढल्या गेली. तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्या समोरासमोर आला. त्या दोघांची नजरानजर झाली आणि ते एकमेकांकडे पाहतच राहिले. मीराचे मोकळे सोडलेले काळेशार केस अर्णबच्या कानाला गुदगुल्या करत होते. एकदम निरव शांतता पसरलेली. त्या दोघांच्या दिर्घस्वासाखेरीज दुसरी कशाचाही आवाज नव्हता. मीराचा प्रतिकार ओसरला, ती ही आपसूकच त्याकडे आकर्षल्या गेली आणि शेवटी दोन जीव एकमेकात संपूर्णपणे विरघळून गेले.

दोन दिवसांनी अर्णब बरा झाला, परत कारखान्यावर जाऊ लागला. कारखान्यावर मामांची तार आली त्यात लिहलं होतं की, ते अजून दोन-तीन दिवसांनी येतील, काळजी करू नये.

अर्णबला आता मात्र काही तरी गडबड वाटू लागली. एवढी हातची काम सोडून मामा थांबले म्हणजे नक्कीच काही तरी कारण असणार. त्याला राहून राहून त्याच्या बाबांच्या तब्यतीची काळजी लागून राहिली, खूप अस्वस्थ झाला. अजून वेळ ना दडवता त्याने लागलीच कोलकात्याला जायचं ठरवलं.

मीराला संध्याकाळी भेटून त्याने होत असलेल्या सर्व घडामोडींचा उलगडा करून सांगितला. मीरालाही त्याचे जाणे महत्वाचे वाटेले पण दुसरीकडे त्याला निरोप द्यायच्या विचारानेच मीराच्या काळजात धस्स झालं.

आणि अर्णब मीराला निरोप देऊन कोलकत्याला गेला…..

क्रमशः

=========

©मंगेश उषाकिरण अंबेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.