पुण्यमृदा
(भाग-आठवा)
तब्बल दहा वर्षानंतर…….
“मालिक वो निसारबेगम मिट्टी देनेसे इन्कार कर रही है, मैं वहा पुरा दिनभर बैठा रहा लेकीन वो नही मानी, कह रही हे के यही मिट्टी क्यू लेते हो ये बता पावोगे तभी मिट्टी मिलेगी” अर्णबचा कारागीर त्याला सांगत होता.
अर्णब दुर्गापूरपासून जवळच एका गावात स्वतःचा मूर्तीकारखाना सुरू केला होता. किमान सहा-सात वर्षापासून तो तिथे कारखाना चालवत होता. काम प्रचंड वाढलं होत हाताखाली दोनचार कामगार होते. त्याचं एकंदर आयुष्य साधं आणि सुरळीतपणे सुरू होतं.
“तुमी की बोलचे, मिट्टी नही मिली तो काम कैसे हो पायेंगा,लगता हे अखिर मुझेही जाना पडेगा, ठीक हे कल मैं ही जाकरआता हूँ, तुम…रहने दो.” अर्णबने शेवटी वैतागत नोकरालाबोलला.
दुसऱ्या दिवशी अर्णब दुर्गेच्या मातीसाठी वेश्यावस्तीत गेला. निसारबेगमच्या दोनतीन गणिका ओट्यावर बसलेल्या होत्या. सगळ्या साजशृंगारात आणि सवरण्यात मशगुल होत्या. निसारबेगमच्या एका गणिकेला त्याने मातीसाठी विनवणी केली. गणिकांनी त्याला थोड्यावेळ वाट बघायला लावत बरेच तास ताटकळत ठेवलं. निसरबेगमची वाट पाहून पाहून अर्णबचा जिव मेटाकुटीला आला होता…… संध्याकाळ होत आली तेव्हा निसारबेगम त्याच्या समोर आली. अर्णबने कळकळीने तिला विनंती केली. निसरबेगमने अर्णबला माती घेऊन जाण्यापासून परत नाकारले आणि हीच माती का हवी, याचे कारण विचारले.
अर्णबने हाथ जोडुन तिला विनवणी करू लागला, “आप को क्या जवाब चाहिये वो मैं नही जानता बस इतना जानता हूँ, मुझेतो सिर्फ ये बतायानगर हे के, ये इस घर की जो चौखट है ना उसके भीतर एक अलगदुनिया है और उसके बाहर एक अलग दुनिया बसी है। स्त्री हो या पुरुष हो, जो भी इस चौखट को लाँगकर इस दुनिया में जब प्रवेश करता है तब वो अपना मान, सम्मान, आदर्श, वुसुल, और अपने अंदर की सब पवित्रता इस चौखट के बाहर छोड आता है। इस चौखट के अंदर जो अपना पहिला कदम रखता हैं, वो उसकी पवित्रताका और सब संचितपुण्य का आखरी कदम होता है। उसके बाद उन सबका जो भी पुण्यसंचित कर्म होता हैं वो इस चौखट के बाहर के मिट्टी मे घुल जाता है, और इसीलिए इस मिट्टी को पुण्यमाटी माना जाता हैं।” अर्णब एकदम तल्लीनतेने डोळे बंद करून निसारबेगमला हे सगळं समजावुन सांगत होता. अर्नबचा आवाज ऐकून आतून एक बाई त्यासमोर येवून ठेपली, आणि ती प्रचंड आवेशाने अर्णबला बोलू लागली.
“अगर ये बात है, तो तुम्हे हर जगह, हर चौराहे पर, हर गली में ये मिट्टी मिल सकती है, उसलिए तुम्हे यहा आने कोई जरूरत नही। हमारी जैसी लडकीयो की रोज कही ना कही, किसीं ना किसीं जगहपे ये पवित्रता बरबाद होती ही रहती है। क्या तुम्हे वो जगह नही दिखती?
…और तुम्हारे जैसे लोग न जाने कितनोके मासुमसी जिंदगी उजाडकर पवित्र होणे का ढोंग रचकरउनही हातो से दुर्गा माँ की मुरत बनाते है| आखिर ये दोगलापन लाते कहा से हो” एवढं बोलतांना तिचा श्वास फुलला होता,तिचे डोळे आग ओकत होते, चेहरा लालबुंद झालेला जशी तिच्यात साक्षात दुर्गाच अवतरली होती.अर्णब तिच्या आवाजनेच इतका घाबरला होता की तो निमूटपणे आपली मान खाली करून हे सगळ ऐकत होता.
“कहो बाबूमोशाय कुछ कहो…..आहे का काही उत्तर ….नाही ना” अर्णबने बाबूमोशाय ऐकताच ताडकनवर पाहिलं. तेव्हा त्याला त्याचासमोर साक्षात दुर्गा बनून उभी ठाकलेली मीरा दिसली आणि त्याच्या पायाखालची जमीन निसटली, सर्व हातपाय गळाले , तो एकदम सुन्न झाला, त्याला काहीच शब्द सुचेना …….. त्याने मोठ्याने आवाज दिला “मीरा तुम!” आणि तो मोठे मोठे हुंदके देत, आपले गुडघेजमिनीला टेकवत तसाच खाली अंगणात कोसळला.
नवतारुण्यात तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा प्राजक्त पार कोमजुन गेला होता. तिच्या बीभस्त आणि भडक शृंगाराने तिला निस्तेज चेहऱ्याला झाकून टाकले होते.
“मीरा नही मीराबाई म्हणतात मला, मीराबाई……” मीरा त्वेषाने त्यावर जोरात ओरडली.
“तुला काय वाटलं तू टाकून दिलंस म्हणून मी स्वतःला संपवून घेईन ……….. हे बघ ही मीरा आज तुझ्या समोर उभी आहे आणि आज तुझ्या सारख्या किती तरी नराधमांना रोज संपवते, त्यांची भूक संपवते, त्यांच्या अतृप्त वासना संपवते.” अर्णबचा पानउतार करणाऱ्या मीराच्या डोळ्यातुन आता आसवे ओघळू लागली होती, श्वास फुलला होता, हात थरथर कापत होते.
“मीरा मैं मानता हु की तुम्हारे साथ जो बिती हे उसका जिम्मेदार सिर्फ मैं हूँ।” अर्णब खाली बसून हाथ जोडून तिला कळकळीने सांगत होता पण मिराचा आवेश त्याच काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीतच नव्हती.
“अजून काय खोटं बोलायचं राहिलं आहे तुझं, तू तुझी वासना तृप्त करून मला वाऱ्यावर सोडून गेला. तुला साधं वाटलं नाही की माझं इकडे काय झालं असेल. अरे मी तर फाशी घ्यालाला गेलं होते फक्त माझा बाप आडवा आला म्हणून मला लग्न करावं लागल. वाटलं लग्न झालं की सगळं सुरळीत होईल पण मला काय ठाऊक की तु माझ्या आयुष्यात किती फरफट लिहून गेलास.
लग्नाला नुकते दोनच महिने झाले होते तेव्हा मला कळलं की माझ्या पोटात चार महिन्याचं तुझं बाळ आहे. ते माझ्या सासरकडच्यांना आणि नवऱ्याला कळायला काहीच वेळ लागला नाही. माझ्या बाबांना ही बातमी माझ्या सासऱ्यांनी सांगितली तेव्हा त्यानां हा झटका सहन झाला नाही आणि जी एकच व्यक्ती माझी उरली होती तीही या जगातून गेली. माझ्या पोटातल बाळ पाडण्यात आलं. याहून काय यातना व्हायचा बाकी होत्या. एवढं करून त्यांच भागल नाही म्हणून त्या हैवानांन मला कोठ्यावर विकल आणि शेवटी मला माझ्या नशिबाने फिरवत फिरवत इथे येऊन फेकलं………. हे सगळं तूझ्यामुळे ….फक्त नि फक्त तुझ्यामुळे मला बघावं लागलं. सांग का? ……. का केलंस असं? मी तुझं काय वाईट केलं होतं रे. माझं फक्त एक चुकलं…..ते म्हणजे मी एका तुझ्या सारख्या ढोंग्यावर प्रेम केलं.” मीराच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू ज्वालामुखीच्या लाव्हा प्रमाणे ओसंडून वाहत होते आणि त्या तप्तलाव्हेत अर्णब जळून खाक झाला होता.
मीराची हृदय पिळवून टाकणारी ती आत्मकथा ऐकून तिथे जमलेले सर्वांच्या डोळ्यातली आसवे तिची सांत्वन करत होती. निसारबेगमने मीराला जवळ घेतलं तिच्या डोळ्याची आसवं पुसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला गोंजारू लागली. इकडे अर्णब तर पूर्णपणे हादरला. ती ज्या ज्या संकटातून,नैराश्यातून, त्रासातून गेली होती आणि जात होती याची साधी कल्पनाही अर्णबचा थरकाप उडवून गेली.
“मैं तुम्हारा कसूरवार हूँ मीरा, मुझे माफ करो…..तुम जो चाहो वो सजा मुझे मंजूर हैं” अर्णबपण अश्रू ढाळत तिच्यापुढे हात जोडून डोकं जमिनीला टेकवून तिच्याकडे गयावया करू लागला.
“मैं मानता हू की तुम्हारे ना कहनेपर भी मैने तुमसे जबरदस्ती की, लेकीन मीरा मैने तुमसे कभी झूट नही बोला। मैं तुमसे और सिर्फ तुमसे शादी ही करना चाहता था।” अर्णब जीवतोडुन तिला सांगत होता.
क्रमशः
पुण्यमृदा
(भाग -नववा)
“मैं जब तुम्हे अकेला छोडकर कोलकता आया तब मेरे बाबा को लकवा हो गया था। मुझे बहुत गहरा सदमा पहुचा मैं दिन रात बाबा की सेवा मे जुटा रहा।”
“एक दिन मामा अपना पुरा सामान वापस लाने के लिए फिर बंबई वापस जा रहे थे। तब मैने उनको अपने दोनो के बारे में सब बात बताई। मामा ने कहा की इन बातो का अब ये वक्त नही। बाबा के ठीक होते ही मैं उनसे तुम दोनो के बारे मे बात करूंगा। अब मैं बंबई जाकर बाबा के तबियत की जानकारी मीरा को देकर उसे कुछ दिन तक रुकने की बिनती करता हूँ।”
“मामा जब वापस आये तब उन्होनें मुझसे कहा की ‘मीरा ठीक हें और कहा है की तुमसे कहा हे की तुम फिलहाल बाबा की तबियतपे ध्यान दो….. वो तुम्हारी राह देखेंगी….तुम सिर्फ तुम्हारे बाबा का खयाल रखो”
“बाबा की तबियत मे कोई सुधार हुवा नही और कुछही दिनो में व चल बसे। बाबा की मौत के तुरंत बाद मैं बंबई आया। आते ही मैं जब सीधा तुम्हारे घर पहुचा तब तुम्हारे बाबाने मुझे बताया की तुम्हारी शादी हो गई है और तुम तुम्हारे संसार में बहुत कुशल मंगल हो। मुझे तुम्हारे बारे जानकर बहुत तकलीफ हुई। मुझे बडा गुस्सा आया, लगा की क्या तुम जरा देर भी रुक नही सकती थी।
तुम्हारे बाबा से मिला और उन्हे हम दोनो के प्यार के बारे में बताया और उनसे तुम्हारा पता पुछा, तब उन्होंने मेरे पैर छुकर मुझसे बिनती किई और कहने लगे की उसका अभी बसाबसाया इतना अच्छा घरसंसार मत तोडो। उनके आसू देखकर मेरा मन भी सहमा उठा और मैने उनको तुमसे कभी ना मिलने का वादा दिया। काश मैं तुमसे उस वक्त मिल लेता तो आज ये मंजर ना होता।’ अर्णब बोलतं होता.
मीरा हे सर्व ऐकून सुन्न झाली, तिच्या सोबत नियतीने मांडलेला हा डाव बघून ती आवाक झाली. तिने हातपाय गाळले, तिच्यात त्राणच नाही उरला आणि ती तशीच अर्णबच्यापुढे खाली पडली.
“पण तुझ्या मामाला हे सगळं करायची गरज काय होती, मी त्यांच काय वाइट केल होत म्हणुन त्यांनी असं केल? काय मिळालं त्यांना असं करून?” मीरा हतबल होऊन बोलत होती.
“मामा ने ऐसा सिर्फ और सिर्फ उनकी लड़की गीता के लिए किया| गीता जनम से अपाहिज होने के कारण मामाको उसकी हरदम चिंता लगी रहती थी| उन्होंने मुझे मन ही मन गीता का पति मान लिया था और वे गीता के लिए कुछ भी कर सकते थे| बेटी के प्यार में वे अँधा हो चुके थे|”
“जब वो बहुत बिमार थे तब उन्होंने मुझे पास बुलाकर, मुझसे इन सब बातोंका प्रायश्चित किया था| तीन साल पहले ही मामा कैँसर के कारण के चल बसे| उपरवालेने उन्हे बहुत ही दर्दनाक मौत दी। मैं यह सब तुम्हे बताने निकला था लेकीन तब तक बहुत देरी हो चुकी थी, मैं सिर्फ इसी ख्याल में था की तुम अपने संसार में खुश हो|”
मीरा त्याचं बोलणं ऐकून काहीवेळासाठी जसा देहातून प्राण जावा अशी निपचित पडली. काहीवेळाने भानावर येत आणि डोळ्यातील अश्रूंना सावरत, अर्णबपुढे हात जोडून म्हणाली,
“मला तर माझं पोटातलं बाळ गेल्यावर ह्या जीवनाकडून कोणतीच अपेक्षा राहिली नव्हती फक्त तुला एकदा ह्या दग्याचा जाब विचारायचा होता. पण हा तर नियतीनेच माझ्या सोबत दगा केला….जा तू…..तुझ्या संसारात खुश रहा” मीरा हताश होऊन अर्णबला बोलत होती.
“संसार…..” फक्त पुटपुटून अर्णब हलकस हसला.
“का ……..काय झालं…..”
“मैं मेरे संसार मे अकेला ही मीरा….”
“का गीताशी लग्न नाही केलं तू” मीराने त्याला आश्चर्यचकित होऊन प्रश्न केला.
क्रमशः
©मंगेश उषाकिरण अंबेकर
◆९८२३९६३७९९
Mast story
LikeLike
Thank You So much… Posted Last Part of the Story.
LikeLike