ऋणानुबंध (भाग-तिसरा)

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सोहम सगळं समान घेऊन दामल्यांच्या दारात पोहोचला. कदाचित तो फक्त आदली रात्र सरण्याची वाट पाहत होता. दामल्यांनी संध्याकाळीच कामवालीला सांगून रूम बऱ्यापैकी साफ करून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण पडीक सामानाची अवस्था आहे तशीच होती. सोहमने मधुरा कढून चावी घेऊन आपलं समान एकदाच पटकल आणि पहिले जून्या सामानाची व्यवस्था करण्यात गुंतला. दामले सकाळी फेरी मारून आल्यावर मधुराने त्यांना सोहम आल्याचा निरोप दिला.

सर्व अवरल्यावर दामल्यांनी सोहमला नाष्ट्यासाठी बोलवायच निमित्यकरून सोहमच्या खोलीकडे गेले. त्याला खाली यायच्या पहिलेच मधुराची व्यवस्थित कल्पना देली, ” हे बघ सोहम, मी तुला माझ्या बोलण्यावर हि खोली देऊ केलीय नाहीतर आम्हाला पेइंगगेस्ट म्हणून फक्त मुलीच ठेवायच्या होत्या, त्यामुळे मधू थोडी नाखूष आहे, ती काही बोलली तर तिचा राग नको मानू, आणि तिच्या समोर थोडं शिस्तीतच वाग, तिला नवख्यावर विश्वास बसायला वेळ लागतो, सांभाळून घे. “

सोहम खदखदून हसत हसत म्हणाला, “हत्त-तीच्या यवडच ना! काय टेनसन घेऊ नका तुमी, आणि त्यांना मनावं पोरीचं ठेवाच्या असतील तर आताबी ठेवू सकता तुमी, मला कायबी प्रोबलॅम नाही बघा, माज तरी कूट लगीन जालय.”

“हे बघ असा फाझीलपणा पुरे कर आता, नाहीतर ती आताच बाहेर काढेल तुला” दामलेपण हसत हसत बोलले आणि मधुराच्या पुढच्या हाकेवर नाष्टा करायला कदोघे खाली गेले.

मधुराने सांगितल्या नियमाप्रमाणे नाष्टा करत दामल्यांनी सोहमला , प्रत्येक घासाला एक नियम सांगत नियमावली त्यासमोर मांडली, पण सोहमला कडाडून लागलेल्या भुकेसमोर सांगितलेला प्रत्येक नियम डोक्यात जाण्याऐवजी पोटात गेला.

“वाSSSवा लयभारी!!!! काय भारी चव आहे या पोयांची..खुप मस्त .” सोहमने दामल्यांकडे दुर्लक्ष करत थेट मधुराला अभिनंदन करत बोलला. बऱ्याच दिवसानंतर एखाद्या भिकऱ्याला अचानक राजभोग भेटावं असं त्याचं झालं होतं. मधुरा ही खऱ्या अर्थाने अन्नपूर्णाच होती दामल्यांनी तिचे हातचे पोहे खाऊनच पसंत केलेलं.

मधुरा सोहमने केलेल्या कौतुकावर भाळली खरी पण मनातली अढी तिच्या बोलण्याला अढसर करत होती, शेवटी थोडं थांबून मौन तुटलंच “खरंच आवडला रे सोहम तुला, थँक्स हं…. नाहीतर हे एक हा आहे जे साठ किलो वरून नव्वदीत पोहोचला पण कधी माझ्या हातच्या जेवणात त्यांना चव सापडली नाही बघ! “

“अगं तुझं हातचं जेवण सुंदरच….पण माझ्या आईच्या हातची उत्कृष्ट त्याची सर याला कसं येणार. ” खऊट बोलण्यात दामले पटाईत. मधुराने जरा डोळे मोठे केलेत आणि दामले निमूटपणे मान खाली घालून खात बसले.

“हे बघा काका, असल्या गोडीला कसलीच तोड नाय. माझी आईपण सेम पोये बनवायची. मला तिच आठवली बघा” सोहम ठासून बोलताना त्याच्या डोळ्यात हलकसे पाणावलेले होते, ते दामले आणि मधुरालाही जाणवलं. त्याचे वाक्य ऐकून तिचेही डोळे पाणावले. वातावरण एकदम भावुक झालं.

“ऑफकोर्स माय डिअर, देअर यु आर. मी हिला हेच सांगतो आपल्या आईच्या हातची चवच सर्वात उत्कृष्ट असते.” दामल्यांनी असं बोलून भावुक होऊ घातलेल्या वातावरणाचं तोंड पुन्हा त्यांच्या पाचकळ विनोदाकडे वळवलं. खरंतर दामलेंच्या असल्या विनोदबुद्धी मुळेच मधुराच्या डोळ्यांना कथ्थकलीच्या अष्टदृष्टीभेदाच नृत्यसौन्दर्य प्राप्त झालं होतं. मधुरा तोंडाने कमी आणि डोळ्यांनीच जास्त बोलायची. परत बुबुळांचे नृत्य सादर करत मधुरा बोलली “बस्स पुरे झाला हं तुझा फाजीलपणा, ऊठ आता कॉलेजला उशीर होतोय तुला.”

दामलेंनी आवरत घेत, कॉलेजला जायच्या तय्यारीत लागले. सोहमने मांजरबोक्याच भांडणाची मजा घेत नाष्टा संपवला. दुपारी राहिलेलं समान आणतो म्हणून जेवायला नाही येऊ शकणार असं सांगून रूम कडे वळला.

मधुरा पण आपल्या कामात गुंतली, दुपारच जेवण आणि वामकुक्षी झाल्यावर दुपारी साडेचारच्या सुमारास सोहम आला. त्यानंतर थोड्यावेळाने मधुरा कामवाली बाईला घेऊन ती सोहमच्या रूमकडे काही आवरायचं राहील का ते बघायला गेली. सोहम आणलेलं समान लावत होता. दार उघडच होतं. मधुरा आणि तिची कामवाली रूम बघून आवक राहिल्या. सोहमने बऱ्याच पडीक वस्तूंचा वापर करत, त्या अजागळ रूमचा पुरता कायापालट करून टाकला होता. निर्जीव वस्तूला सजीवत्व प्राप्त झाल्यावर जसा आनंद होतो तसा काहीसा आनंद मधुराच्या चेहऱ्यावर दिसला. सोहम रूम सावरण्यात इतका गुंगला होता की त्याला यांच्या येण्याचं भान पण नव्हतं. मधुराने पण त्याच्या कामात अडथळा न आणता, कामवलीला घेऊन तेथून माघारी फिरली.

आधिच सकाळी नाष्ट्याच्या वेळेसचे सोहमचे पाणावलेले डोळे पाहिल्यापासून मधुराच्या मनात सोहमचे विचार घोळत होतेच. आणि आता त्याचा व्यवस्थितशीर आणि समंजसपणा बघून त्याबद्द्लचा झालेला गैरसमज पूर्णपणे पुसल्या गेला. दामले घरी परतल्यावर तिने पाहिलेला वृत्तांत त्यांच्या समोर मांडला. दामल्यांना सोहमचा आणि त्यापेक्षा थोडं जास्त म्हणजे स्वतःच्या निवडीच जास्त कौतुक वाटलं.

जवळपास वीस दिवस होत आले होते. नाष्टा झाला की सोहम आणि दामलें सोबतच घराबाहेर पडायचे. सोहमची एक चिंता मिटली होती परंतु नोकरीचा शोध सुरूच होता. सोहम वणवण करत ठिकठिकाणी मुलाखती देत आणि दिडच्या सुमारास जेवयाला घरी येत असे. घरी आला की हातपाय धुवून जेवणाच्या ताटावर आधाश्या सारखा तुटून पडायचा. दुपारच्या जेवणाला मधुरा आणि सोहम दोघंच असायचे. हळूहळू मधुराच आणि सोहमच बोलणं वाढतं होतं. काही दिवसांनी तर जेवण थोडं आणि गप्पाष्टक जास्त, दोघे असे निवांत वेळ घालवायचे. तसं दुपारच्या जेवणात मधुरा स्वतःसाठी काही जास्त करत नव्हती पण मधुरा दुपारच्या जेवणाला सोहमच्या आवडीचे नाना तऱ्हेचे पक्वान्न करु लागली आणि त्याच्यासाठी आवर्जून थांबु लागली. याचं दुपारच्या सहवासा दरम्यान दोघे एकमेकांच्या बरीच जवळ आली होती. एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी, जुन्या आठवणी आणि दामल्यांचे किस्से अश्या बऱ्याच गोष्टींवर दोघांच्या चर्चा रंगायच्या. मधुराला आपल्यापेक्षा सोहमच्या भूतकाळाबद्दल जास्त कुतूहल वाटायचं. या गप्पा गप्पात मधुराला सोहमबद्दलचा जवळपास सर्वच गोष्टी कळल्या होत्या. तिच्या मनात सोहम बद्दल सहानुभूती वजा प्रेम निर्माण व्हायला जास्तवेळ नाही लागला. पुढे दोन-तीन महिन्याभराच्या काळातच दोघांमध्ये भरपूर जवळीक वाढली.

सोहम आल्यापासून मधुराने पण त्याच्यासाठी खास खास पदार्थांची रेलचेल सुरू केली होती. संध्याकाळी दामलें आले की रात्री तिघे सोबत जेवण करत. जेवण उरकल्यावर दामलें आणि सोहम कॅरम खेळत आणि गप्पा मारत. रात्री झोपायच्या वेळी बिछान्यावर मधुरा दामलेंना तासनतास सोहमच्या दिवसभरच्या सर्व गोष्टी सांगायची. एकंदर सर्व गुण्यागोविंदाने चाललं होतं. कोणाची नजर ना लागो यांच्या सुखाला.

क्रमशः

मंगेश उषाकिरण अंबेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.