पुण्यमृदा (भाग-पहिला)

आपल्यासमोर ऐंशीच्या दशकातील एक कथा सादर करत आहे. ही कथा मीरा आणि अर्णबच्या प्रेमाची, सत्याची, दगाबाजीची, अपवित्रतेची आणि त्या दोघांमधील दुवा ठरलेल्या त्या मातीची जी सर्वात पवित्र मानली जाते.

पुण्यमृदा

“अरे ओ बाबूमोशाय, इतनी जलदी जलदी में कहा जा रहे हो”

चाळीतल्या जिन्यापाशी उभ्या असलेल्या मीराने वरच्या जिन्यावरून घाईघाईत खाली येत असलेल्या अर्णबकडे विचारपूस केली. मीराची हाक ऐकून अर्णबचा वेग तिच्याजवळ येऊन थोडा मंदावला.

नुकतीच मलमली तारुण्यात आलेली मीरा एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरातली मुलगी. नाके-डोळी सुंदर आणि सावळीशी ही तरुणी, साधारण तिच्याच वयाच्या एका गोऱ्यागोमट्या, टपोऱ्या डोळ्याच्या बंगाली अर्णबच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. अर्णब मीराच्या प्रेमाला ओळखून होता, त्यालाही ती आवडायची पण तो तिच्या प्रेमात कधीच गुंतलेला नव्हता.

अर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिकायला आला होता. त्याचा मामा एक खूप सुंदर मूर्तिकार होता. मामा एका मूर्तिकारखान्यावर काम करत आणि सोबत अर्णबला घेऊन जात.

“अरे किचु ना, बस थोडा काम से जा रहा हूँ| तुमि आसचे ?”

एवढं बोलुन अर्णब पुढे दोन पायऱ्या उतरू लागला तितक्यात मीरा बोलली

“हो, पण जायचं कुठय?…….अरे रुको तो सही”

“अरे बाबा, यही नजदीक ही है, लेकीन छोडो तुम वहा आ नहीं सकोगी, रहने दो|” या अर्णबच्या बोलण्यावर मीरा लगेच पेटून उठली .

“अरे व्वा! अशी कोणती जागा आहे जिथे तू बंगाली जावू शकतो आणि ही मराठी लेक जावू नाही शकत? …. सांग तर जरा” मीरा त्याच्या मागे मागे जिना उतरत त्याला म्हणाली.

” नही बता सकता तुम्हे, अब छोडो बाबा मुझे” अर्णब काढता पाय घेत चाळीच्या बाहेर पडला खरा पण मीरा त्याचा काही पिच्छा सोडायला तय्यार नव्हती. ‘तुम वहा आ नहीं सकोगी’ या वाक्याने तिची उत्कंठा अजून वाढली आणि तिने शेवटी अर्णबचा हात पकडून त्याला थांबवल.

“सांग कुठे चालला नाही तर मी जावूच देणार नाही”

मीराच्या हट्टापुढे अर्णब आता पुरता बुचकाळ्यात पडला आणि अखेरीस त्याला सांगण्याशिवाय काही मार्ग राहिला नाही.

“अरे बाबा, छोडो छोडो बताता हूँ” अर्णब मीराचा हात झटकत, “मैं वेश्यालय जा रहा हूँ” बिचकत बिचकत अर्णब बोलला आणि अर्णबच्या या वाक्यावर मीरा अक्षरशः उडालीच.

“पागल झालास का? काय बोलतोय तू तुला तरी कळतंय का?”

“सच्ची सच्ची बाबा, मैं उधरही जा रहा हूँ'” अर्णबच उत्तर पूर्ण होतं ना होतं तोस्तोवर मीराने त्याच्या समोर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

“पण का? क्या काम है तुम्हारा वहा? तू असा असशील असं अजिबात नव्हतं वाटलं मला…छे…..छे…” मीराने पार त्याच्या इज्जतीचे धिंढवडेच काढले. पण तो आपल्या चेहऱ्यावरच हसू कायम ठेवत मिश्कीलपणे पुढे उत्तरला, “अरे हर बार मामा वहा जाते है, लेकीन इस बार वो बिमार हे इसलीये मुझे जाना पड रहा है।” अर्णबच्या या प्रतिक्रियावर मीरा अजून संतापली आणि नाक मुरडत….”शी …तुम भी वैसे और तुम्हारे मामाभी, और ये बताने में भी शर्म नहीं तुमको.”

अर्णब मीराचा राग पाहून आपली चेष्टेला विराम देत, निमूटपणे मीराची समजुत काढण्यास पुढे सरसावला. “मीरा सुनो तो….जो तुम सोच रही हो वैसा कुछ नही है, मैं तो वहा से सिर्फ मिट्टी लाने जा रहा हूँ “

“मिट्टी!…. ते कश्यासाठी…. हां…हं… बरोबर आहे म्हणा….लोकं पण तिथे माती खायलाच जातात, तू तर ती घरी आणुन खात असशील. बावळट मेले.” मीरा भयंकर चिडली होती. वेश्यालय बद्दलची चिड तिच्या डोळ्यात दिसत होती. अर्णबला कळुन चुकले होते की आपली मस्करीची चांगलीच फसगत झालीये त्याला मीराला कसं समजावं ते कळेना.

“अरे ना बाबा, तुम जरा पुरी बात तो सूनलो मेरी”

“क्या बात सूनलो, काही वाटतं का तुला”

“फिर तुम शुरू हो गयी। बैठो यहापे जरा, तुम्हे सब बताता हूँ।” अर्णब ने तिला एकदाच शांत करत बाजुच्या कट्ट्यावर बसण्यास सांगितले आणि व्यवस्थित समजावून सांगण्यास सुरवात केली.

क्रमशः

©मंगेश उषाकिरण अंबेकर
◆९८२३९६३७९९

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.