सॉफ्टकोपी

काही काही बायका किती भाबड्या असतात यावर विश्वासच बसत नाही. हो, हो! मी भाबड्याच म्हणलो, बबड्या नाही. उगाच विषयाला भलतीकडे वळण नको. खरं सांगायचं झालं तरं नित्यनियमाने “ह्या बबड्याने वीट आणलाय नुसता!” असं उच्चारानेच या मालिका नित्यनियमाने का पाहतात? हा मोठा गहन व भाबडा प्रश्न मला पडतो. बरं इथपर्यंत ठीक आहे हो! पण काही बायका…

बापमाणुस

“मला ते काय माहीत नाही. बाबा मला स्पोर्ट बाईक पाहिजे म्हणजे पाहिजेच.” मानस आज हट्टाला पेटला होता. “हे बघ मला आता खरचं झेपत नाही. पोस्टग्रॅज्युएट होऊन आता वर्ष झालय तुला, तेव्हा तू कामाचं बघ आणि तुला वाट्टेल ते घे.” श्यामराव अगदी सणसणीत उत्तरले. “या इथे..मला काय काम भेटणार? मला नोकरीसाठी शहरातच जावं लागेलं आणि तसही…

लहानपण देगा देवा ……

आज एका सोशल साईटवर मला माझ्या बालवाडीतल्या मित्रांचा समूह गावला. लहानपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. ऑफिसातून घरी जाऊस्तोवर तासाभराच्या प्रवासात सगळी जुनी पाने डोळ्यासमोर भरभर येऊन गेली. गोड जुन्या आठवणीत जस मन ढवळून निघत होत आणि तस तसं चेहऱ्यावर हसू फुलत होत. रस्त्यावरची लोकं मला “आज येरवाड्यातला एक बाहेर पडलेला दिसतोय” या नजरेने बघत होती,…

बादशाही पोहे

शीर्षक वाचुन थोडं बुचकळ्यात पडला असाल ना! दररोजच कांदा पोहे तर खातोच, आता त्यात “बादशाही पोहे” हा काय प्रकार बुवा ! तर या “बादशाहीयत” च्या मागे एक सुंदरता लपली आहे, ती पहीले तुम्हाला सांगतो. आमचे पिताश्री श्री किरणराव अंबेकर यांना खाण्याबाबत असे फारसे काही स्वारस्य नाही पण बादशाही पोहे म्हणजे त्यांच्या जीव की प्राण. ते…

हॉटेलातल्या भाज्या घरी बनवा

सर्वांना नेहमीच पडलेला एक प्रश्न, “ह्या हॉटेल सारख्या भाज्या घरी का नाही होत बरं?” हाच प्रश्न मी माझ्या एका हॉटेल व्यावसायिक मित्राला “बाळ्याला” (आताचा बाळूअण्णा शेठ) केला होता, त्यावर त्याने असं खोचक उत्तर दिलं “अरे लेकाच्या, दररोजच्या भाज्यांची चव, जर हॉटेल सारखी झाली तर माझ्या हॉटेलात कोण येणार रे आणि तू हॉटेलातल्या भाज्या रोज रोज…

झणझणीत मिसळ

मिसळ एक झणझणीत पदार्थ. ओह…सोssss सोssss सॉरी मुळात मिसळीला नुसतं पदार्थ म्हणणं चुकीचच. मिसळ तर एक चवदार, चटकदार आणि चमचमीत अश्या सर्व’च’संपन्न कुटुंबतील एक राजेशाही व्यंजन. मिसळला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजवैभव प्राप्त आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर अशा महाराष्टातल्या कानाकोपऱ्यात तुम्हाला मिसळीची चव एकसारखी भेटली तर नवलच. प्रत्येक ठिकाणची एक वेगळी खासियत…

काळा रस्सा

​माझ्या सारख्या सदैव भुकेल्या ढेरपोट्या समोर काळारस्याचे नुसतं नाव जरी काढलं तरी ही अतृप्त जीभ ओठांवर सैरसपाटा मारू लागते, पोटातला जठराग्नी पेटून उठतो आणि घसा नुसता लाळेचे घोट गिळतो, जीभेचे नुसते तुकडे तुकडे होऊन एक एक तुकडा हा काळा रस ग्रहण करण्यास पुढे सरसावतो​. ​पण तसं काळ्यारस्स्या बाबत हे साधारणतः सर्वांचेच हाल.​ एका गावाकडच्या घरंदाज…

कांद्याचं चुटचुटं

“मी काय म्हणतो,जे झालं असलं ते दे. मला उशीर होतोय.” “अरे, हे बघ ! पोळ्या झाल्या. कांदा पण परतला आता, फक्त बटाटे टाकुन थोडं शिजवले की झालं!….. भाजी तय्यार!” तिकडे माझ्या ‘अगं’ची मला डब्बा देण्याची तगमग, तडफड सुरू होती आणि इकडे माझी ऑफिसला जायची धुसमुस चालू होती. त्यात या कोरोनाच्या काळात ‘डब्बा राहू दे!’ म्हणणं,…

बायंगी (भाग-५ अंतिम भाग)

मुंबईला माघारी परतत असतांनाच माझे सगळे प्लॅन ठरले. माझ्या हातात बायंगी पडताच, जणू काही माझे सगळे प्रश्न सुटले होते. डोक्यात विचारांची चक्रे बेभान होऊन फिरू लागली. काय करायचं? कसं करायचं? हे सगळं ठरवूनच माझा पाय मुंबईत पडला. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी सगळ्यात पहिले नोकरीला लाथ मारली आणि व्यवसाय करायचं पक्क केलं. व्यवसाय,…